जगातील टॉप-5 श्रीमंत क्रिकेटर ; विराट नाही तर ‘हा’ खेळाडू आहे सर्वात श्रीमंत, याच्या श्रीमंतीसमोर विराट काहीच नाही….

आपल्या देशात इतर कोणत्या खेळाचे दिवाने असो व नसो मात्र, क्रिकेटचे भरपूर दिवाने आहे. आपल्या देशातील क्रिकेटर्सचे आयुष्य म्हणजे एखाद्या फिल्मस्टार पेक्षा कमी नाहीये. केवळ आपल्याच देशात का, संपूर्ण जगात क्रिकेटचा भलामोठा चाहतावर्ग आहे. क्रिकेटर्स लाखो-करोडोने पैसे कमवतात हे आपल्याला माहीतच आहे.
आयपीएल मधून तर या खेळाडूंना, भलीमोठी रक्कम मिळते. शिवाय अनेक ब्रँड्सची जाहिरात यामधून देखील ते भरपूर पैसे कमवतात. दरवर्षी सर्वात श्रीमंत क्रिकेटर्सची यादी जाहीर होते. त्यामध्ये अनेक भारतीय खेळाडूंचा समावेश असतोच. बघा तर जगातील सर्वात श्रीमंत ५ क्रिकेटर्स.
२. एम एस धोनी :- एम एस धोनी सोबत भारतातील लोकांचे मनाचे नाते आहे. वर्ल्ड कप जिंकण्याचे भारतीयांचे स्वप्न धोनीने आपल्या उत्कृष्ट अश्या संघटन शैलीने शक्य करून दाखवले. धोनी हा जगातला सर्वात श्रीमंत खेळाडू आहे. अंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून त्याने संन्यास घेतला असला तरीही, आजदेखील त्याचा भलामोठा चाहतावर्ग आहे.
आयपीएल तर अनेक लोकं केवळ धोनीचा खेळ बघण्यासाठी पाहतात. एका रिपोर्टनुसार धोनीची ७६७ कोटी इतकी जास्त वर्षाची कमाई आहे. धोनीने नुकतंच पुण्याच्या पीसीएमसी भागात एक बांगला विकत घेतला आहे. त्याच्याकडे भरपूर गाड्या आहेत, खास करुन महागड्या बाईक्स आहेत.
३. विराट कोहली :- विराट कोहली आपल्या नावाप्रमाणेच विराट खेळी करतो. त्याच्या या खेळामुळे आणि परफेक्ट अश्या शॉट्सचे अनेक चाहते आहेत. कित्येक क्रिकेटर्स स्वतः विराटाचे फॅन्स आहेत. विराट सध्या टीम इंडियाचा कॅप्टन आहे आणि कमाईच्या बाबतीत देखील तो सर्वात पूढे आहे. जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीमध्ये त्याचे तिसरे नाव आहे. त्याची ६३८ कोटी रुपये वर्षाची कमाई आहे असं सांगितलं जात. टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून त्याला दरवर्षी ७ कोटी इतका पगार मिळतो.
४. रिकी पॉन्टिंग :-ऑस्ट्रेलियाच्या सर्वात मोठ्या खेळाडूंपैकी एक म्हणून रिकी पॉन्टिंगची ओळख आहे. आत्तापर्यंतचा तो सगळ्यात यशस्वी कॅप्टन आहे, असे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मानतात. अंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून संन्यास घेतल्या नंतर आता तो, आयपीएल मध्ये दिल्ली कैपिटल्सचा प्रमुख कोच आहे. तो आयपीएल मध्ये कमेंट्री देखील करतो. त्याचे वार्षिक उत्पन्न ५०० कोटी इतके आहे.
५. ब्रायन लारा :- वेस्टइंडियाच्या मोठाल्या खेळाडूंपैकी एक ब्रायन लारा आहे. त्याने संन्यास घेऊन, कित्येक वर्ष झाले असून देखील त्याचा भलामोठा चाहतावर्ग आहे. त्याची ४१५ कोटी वार्षिक कमाई आहे.
६. क्रिस गेल :- आयपीएलचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून अनेक वर्षांपासून क्रिस गेल आपली जागा सांभाळून आहे. वेस्टइंडिजचा सगळ्यात चांगल्या खेळाडूंपैकी एक म्हणून क्रिस गेलची ओळख आहे. क्रिस गेलचे वार्षिक उत्त्पन्न २६० कोटी इतकं जास्त आहे. आयपीएल मध्ये अजूनही, सर्वच टीम मोठी रक्कम देऊन आपल्या टीम मध्ये घेण्यास नेहमीच प्रयत्न करत असतात, यावरुनच त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो.