रियल लाईफमध्ये खलनायक ठरलेल्या संजय दत्तला ‘या’ दिग्गज दिग्दर्शकाने लगावली होती कानाखाली… देत होता ‘या’ अभिनेत्रीला त्रास..

रियल लाईफमध्ये खलनायक ठरलेल्या संजय दत्तला ‘या’ दिग्गज दिग्दर्शकाने लगावली होती कानाखाली… देत होता ‘या’ अभिनेत्रीला त्रास..

बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत की जे त्यांच्या वेळा पाळत नाहीत. म्हणजे शूटिंगचा ठरलेला वेळ पाळत नसल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो. यामध्ये दिग्दर्शक आणि निर्मात्याचे मात्र खूप मोठे नुकसान होत असते. तसेच एखादा अभिनेता उशिरा शूटिंगवर येत असेल तर त्या अभिनेत्रीला देखील त्याचा तेवढा त्रास होतो. याबाबत उदाहरण द्यायचे झाले तर गोविंदा याचे द्यावे लागेल.

गोविंदा हा त्याच्या नियोजित वेळेपेक्षा किती तरी उशिराने नेहमी यायचा. त्यामुळे अनेक दिग्दर्शक त्याला वैतागले होते. डेव्हिड धवनने तर याबाबत अनेकदा तक्रार देखील केली होती. त्यामुळेच गोविंदा आणि डेव्हिड धवन यांच्या संबंधात दरार पडली होती. डेव्हिड धवन आणि गोविंदा यांनी अनेक चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. ही जोडगोळी आली की चित्रपट हमखास हिट असे समीकरण झाले होते.

मात्र, एका मुलाखतीत डेव्हिड म्हणाले होते की, गोविंदा नेहमीच सेटवर उशिरा यायचा. त्यामुळे चित्रीकरणाला उशीर व्हायचा. यामुळे खूप नुकसान सहन करावे लागत असे. असेच काही अभिनेते देखील बॉलिवूडमध्ये पाहायला मिळतात. अनेक अभिनेते तर मद्यपान केल्याशिवाय चित्रीकरण करत नसल्याचे देखील पाहायला मिळाले. यामुळे दिग्दर्शकांना अनेकदा मनस्ताप करावा लागतो. आम्ही आपल्याला आज एका दिग्दर्शकाविषयी सांगणार आहोत की जाने एका अभिनेत्याला कानाखाली लगावली होती.

सुभाष घई यांनी 1976 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांनी करिअरच्या सुरुवातीलाच कालीचरण हा चित्रपट बॉलीवूडला दिला. त्यावेळी घई हे लोकप्रिय नव्हते. या चित्रपटात अनेक अभिनेत्यांनी काम करण्यास नकार दिला होता. त्यानंतर ते आपला मित्र शत्रुघन सिन्हा यांना भेटले.

त्यानंतर ते एन सीप्पी यांना भेटले आणि या चित्रपटासाठी मी शत्रुघन यांना घेण्याचा विचार करत असल्याचे सांगितले. त्यानंतर चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले. काही वाद झाले आणि घई आणि सिपीमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. हा व्यावसायिक वाद होता असे सांगण्यात आले. कालांतराने या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आणि हा चित्रपट हिट झाला की, सुभाष घई यांना बॉलीवूड ला नवीन ओळख मिळाली.

त्यांनी बॉलिवूडला अनेक चित्रपट दिले आहेत. यामध्ये हिरो, विधाता, सौदागर, परदेस, ताल यासारख्या चित्रपटाचा समावेश करावा लागेल. घई आपल्या कामाप्रती निष्ठावंत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, चित्रपटातील कलाकार अशी निष्ठा पाळत नसतील तर ते तेवढेच संताप करत असल्याचे देखील सांगण्यात येते. सुभाष घई यांनी संजय दत्त यांच्यासोबत खलनायक हा चित्रपट देखील केला होता.

हा चित्रपट खूप चालला होता. या चित्रपटानंतर संजय दत्त याला मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी अटक झाली होती. त्यानंतर त्याला रिअल खलनायक असेदेखील संबोधण्यात येत होते. सुभाष घई यांनी संजय दत्तबरोबर विधाता या चित्रपटात देखील काम केले होते. या चित्रपटात गुलशन राय यांनी संजय दत्त यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यामुळे घई यांनी संजय दत्त याला या चित्रपटासाठी घेतले.

पद्मिनी कोल्हापुरे हिला त्रास दिल्याने घई यांनी संजयला लगवली गालात…

विधाता या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना संजय दत्त हा नेहमी सेटवर उशिरा यायचा. तसेच ड्रग घेऊन सेटवर या. त्याचे चित्रीकरण करण्यास देखील नकार द्यायचा. एक वेळ तो पद्मिनी कोल्हापुरे हीच्याकडे वाईट नजरेने पाहत होता. तसेच अनेकदा पद्मिनी कोल्हापुरे ची सेटवर छेड देखील काढत होता. एक दिवस चित्रीकरणाला आल्यानंतर त्याने पद्मिनी कोल्हापुरे यांना खूप त्रास दिला.

त्यामुळे सुभाष घई यांनी संजयच्या कानफटात लगावली. त्यावेळेस संजय दत्त हा नशेत असल्याचे सांगण्यात येते. हा चित्रपट हिट झाला. मात्र, सुभाष घई यांनी पुढच्या हिरो चित्रपटात जॅकी श्रॉफ याला घेतले होते. कालांतराने संजय दत्त याची ड्रग्सची सवय कमी झाली होती. त्यानंतर घई यांनी संजय दत्त सोबत खलनायक चित्रपटात काम केले.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *