ज्या बॉलिवूड अभिनेत्याला रिंकुला करायचं होतं ;डेट’, थेट त्याचीच झाली ‘भेट’ ! फोटो व्हायरल….

‘सैराट’ फेम म्हणजेच आपली लाडकी आर्ची आज मराठीमधील प्रसिद्ध अभिनेत्र्यांपैकी एक आहे. तिने तिचा उत्तम अभिनय आणि काम करण्याच्या शैलीमूळे रिंकूने मराठी सिनेश्रुष्टीत आपली ओळख निर्माण केली. आज रिंकू नेहमीच काही ना काही कारणारनं चर्चेत असते.
काही दिवसांपूर्वीच रिंकूचा मेकअप सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘सैराट’ सिनेमानंतर आर्चीच्या लव्ह लाइफ बद्दल जाणून घ्यायची उत्सुकता सर्वांनाच आहे. मात्र रिंकू नेहमी यावर बोलणं टाळते. एरवी बोलणं टाळणाऱ्या रिंकूनं काही दिवसांपूर्वी तिच्या रिलेशनशिप स्टेटस बद्दल खुलासा केला होता. एवढंच नाही तर बॉलिवूडच्या एका अभिनेत्याला डेट करण्याची इच्छाही बोलून दाखवली होती.
रिंकूला ज्याला डेट करायचं होतं रिंकूला जो बॉलिवूड हिरो आवडतो त्याच नाव विक्की कौशल आहे. शेवटी रिंकू आणि विक्कीची भेट झाली. आणि निमित्त होतं विकीच्या ‘भूत’ सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंगचं. या स्क्रिनिंगला रिंकूनं हजेरी लावली होती आणि त्यावेळी तिने विक्की सोबत एक फोटोही काढला जो तिने तिच्या इन्स्टाग्राम वरून शेअर केला आहे. रिंकूने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
रिंकूने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे तिच्या चाहत्यांशी गप्पा मारल्या होत्या..तिनं Ask Me Anything च्या माध्यमातून चाहत्यांशी गप्पा मारल्या. यावेळी एका चाहत्यानं तिला तुझा बॉयफ्रेंड आहे असा प्रश्न विचारला होता. चाहत्याच्या या प्रश्नाचं उत्तर रिंकूनं ‘नाही’ असं दिलं होतं.