धक्कादायक ! सलग 7 शतक ठोकणाऱ्या ‘या’ भारतीय क्रिकेटपटूच कोरोनामुळे निधन…

संपूर्ण जगामध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे असंख्य लोक यामुळे मुर्त्युमुखी पडले आहेत. या महामारीमुळे अनेक लोकांचा रोजगार गेल्यामुळे असंख्य लोक बेरोजगार झाले आहेत. आणि नवीन रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
अशामध्येच आता आयपीएल काही दिवसात सुरु होणार आहे. आयपीएलचा 13 वा सीजन सुरू होण्यापूर्वीच चेन्नई सुपरकिंग्जच्या संघाला मोठा ध-क्का बसला होता. या संघाचे काही सदस्य को रोना पॉ*झिटिव्ह असल्याचे आढळले होते. हा संघ लवकरच त्यांचा सराव सुरू करणार होता परंतु आता त्यांना आणखी एक आठवडा अधिक सराव थांबवावा लागेल.
मुंबई मध्ये राहत असलेले माजी क्रिकेटपटू सचिन देशमुख यांचे को*रो*ना*व्हा*यरसमुळे नि*धन झाले आहे. ठाण्यातील वेदांत रुग्णालयात मंगळवारी त्यांनी अ*खेरचा श्वास घेतला. ते 52 वर्षांचे होते. त्यांच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार त्यांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला गेला आणि बर्यालच दिवसांपासून त्यांना ताप होता.
9 दिवसानंतर ते कोरोना पॉजीटीव्ह असल्याचे आढळले. सचिन देशमुख एक हुशार क्रिकेटपटू होते. त्यांच्या काळात त्यांना रणजी करंडकात मुंबई आणि महाराष्ट्र या दोन्ही संघांसाठी स्थान मिळाले. पण त्यांना कधी इलेव्हन मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.
सचिन देशमुख एक धमाकेदार फलंदाज होते:- टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने त्यांचा मित्र अभिजीत देशपांडे यांच्याशी बोलून लिहिले आहे की सचिन देशमुखने 1986 च्या कूच विहार करंडक स्पर्धेत आपल्या कर्णधारपदाखाली चांगली कामगिरी केली होती. त्यांनी पाच डावांमध्ये 3 शतके ठोकली, ज्यात 183, 130 आणि 110 धावांचा समावेश होता. अभिजीत त्यांच्याबरोबर शालेय क्रिकेट खेळत असे. सचिन देशमुख हे सध्या मुंबईत उत्पादन शुल्क व सीमाशुल्क विभागात अधीक्षक म्हणून काम करायचे.
7 सामन्यात सलग 7 शतके:-१९९० च्या दशकात सचिन देशमुख यांनी इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेत आपली चमक दाखविली. त्यावेळी त्यांनी 7 सामन्यात 7 शतके ठोकण्याचा अनोखा विक्रम रचला होता. ते मधल्या फळीतील एक धडाकेबाज फलंदाज होते.
भारताचे माजी यष्टिरक्षक माधव मंत्री यांच्या म्हणण्यानुसार सचिन देशमुख एक अतिशय हुशार आणि प्रतिभावान क्रिकेटपटू होता. त्यांच्या जवळचा मित्र रमेश वाजगे यांनी सांगितले की कोरोनाला हळूवारपणे न घेण्यासाठी त्यांचा मृत्यू प्रत्येकासाठी एक संदेश आहे. वास्तवात उशिरा रुग्णालयात दाखल झाल्यामुळे सचिन देशमुख यांचे निधन झाले.
सचिन देशमुख यांनी अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत पुण्याच्या संघाकडून खेळताना सलग सात शतके ठोकली होती. मुंबईमध्ये महिंद्रा क्लब आणि दादर पारसी झोरास्ट्रीयन क्लबमधून ते स्थानिक क्रिकेट खेळत होते. एक धमाकेदार क्रिकेटपटू म्हणून त्यांना ओळखत असत. पण त्यांना झालेल्या दुखापतींमुळे ते जास्त काळ क्रिकेट खेळू शकले नाहीत.
पण युवा क्रिकेटपटूंसाठी मात्र ते एक प्रशिक्षक होते. कारण होतकरू क्रिकेटपटूंना ते नेहमीच मदत करत असायचे. मुंबई आणि महाराष्ट्रामधून चांगले क्रिकेटपटू घडावेत असा त्यांचा मानस होता. त्यामुळे तरून क्रिकेटपटूंना ते नेहमी मदत करत असायचे.