विनोदवीर सागर कारंडे अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी करत होता हे काम, मिळायचे इतके पैसे..!

महाराष्ट्रातील घराघरात पोहचलेला सर्वात प्रसिद्ध कॉमेडी रियालिटी शो चला हवा येऊ द्या आपण सर्व आवर्जून पाहत असतो. या शोमध्ये आतापर्यंत अनेक मोठमोठ्या बॉलिवूड कलाकारांनी आपली हजेरी लावली आहे. हा शो प्रसिध्द झाला ते फक्त शोमध्ये काम करणाऱ्या कलाकरांमुळेच, शोमधील प्रत्येक कलाकाराने आपली वेगळी छाप सोडली आहे.
म्हणून आज आपण या शोमधून घराघरात पोहोचलेल्या सागर कारंडेबद्दल जाणून घेणार आहोत. सागर कारंडे अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी एका कंपनीत काम करत होता हे खूप लोकांना माहीत नसेल.
दरम्यान, सागरने त्याच्या स्ट्रगलच्या दिवसातील एक मजेशीर किस्सा सांगितला ‘त्यावेळी नाटकातून पैसे मिळायचे हे मला माहीतच नव्हते. चर्चगेट येथील एलआयसीच्या कार्यालयात सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी काहीतरी मनोरंनात्मक कार्यक्रम सादर करायला मला बोलावलं.
मी तिथं गेलो आणि दहा मिनिटांच नाटकुले सादर केले. त्याचे मला एकशे एक रुपये मानधन मिळालं. माझ्या उभ्या आयुष्यात मानधन हा शब्द त्यावेळी पहिल्यांदा ऐकला होता.”