सकाळी लवकर उठून ‘ही 4’ कामे केल्याने होतात ‘हे’ आरोग्यवर्धक फायदे जाणून घ्या….

आपल्या महान संस्कृतीने मनुष्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी त्याचे आचरण, विचार, कृती यांच्यासाठी काही नीतिनियम ठरवून दिले आहेत. भारतीय संस्कृतीने मनुष्याची दिनचर्या कशी असावी याचे सुद्धा मार्गदर्शन निरनिराळ्या प्राचीन साहित्यामध्ये केले आहे.
मनुष्याची दिनचर्या प्रातःकाळी सुरू होते त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात सकाळी उठल्यापासून खऱ्या अर्थाने त्याचा दिवस कसा जाईल हे तो सकाळी उठल्याबरोबर काय करतो यावर अवलंबून असते. म्हणूनच आज सकाळी उठल्याबरोबर आपण काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे त्या गोष्टी पाहणार आहोत.
सकाळी उठल्यावर काही लोकांना बद्धकोष्ट, अपचन, ॲसिडीटी यांसारख्या आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्याचे जाणवते. या सर्व आरोग्यविषयक समस्यांवर सुद्धा आपल्या पूर्वजांनी उपाय सांगितले आहेत. तांब्याचा भांड्यामध्ये भरून ठेवलेले पाणी बद्धकोष्टता व अन्य अनेक उपायांवर अगदी अमृतासमान मानले जाते.
रात्री तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवावे व सकाळी चहा किंवा तत्सम कँफेनयुक्त पदार्थ पिण्या अगोदर तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे सेवन करावे यामुळे अपचनाच्या समस्या दूर होतात व दिवसभर आपल्याला उत्साही वाटते.
व्यायाम हे यशस्वी जीवनासोबत दीर्घायुष्यासाठी ची गुरुकिल्ली आहे. सकाळी उठल्याबरोबर चालणे ,धावणे ,जिम ,योगा यासारख्या कोणत्याही आपल्या आवडीच्या व्यायाम प्रकाराला करणे हे शारीरिक पूर्तीसाठी फायदेशीर आहे.
सकाळी उठल्याबरोबर सोशल मीडियाचा वापर करण्याची अनेक जणांना सवय असते मात्र यामुळे रात्रीच्या झोपेने मिळालेली सर्व ऊर्जा व आराम नष्ट होऊन पुन्हा एकदा आपण तणावाला बळी पडायला लागतो. त्यामुळे शक्यतो सकाळी उठल्यानंतर सोशल मीडियाचा वापर जितका टाळता येईल तितका तो टाळावा.
सकाळी उठल्यावर आपल्या शरीराला योग्य ताण देऊन शरीरातील नसा मोकळ्या कराव्यात.सु
सूर्योदयानंतर खूप उशिरा उठणा-या व्यक्तीमध्ये अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्याचे काही संशोधनांमध्ये आढळून आले आहे. जे लोक सातत्याने सूर्योदयानंतर उशिरा उठतात त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती ही सूर्योदयाच्या अगोदर उठणा-या व्यक्तीन पेक्षा कमी असल्याचे दिसून येते.