साक्षात भगवंतानेच दिले होते भूमिका स्वीकारण्याचे संकेत..वाचा, नेमके काय घडले ?

आपण आजवर अनेक वेळा असे ऐकले असेल की, स्वप्नात देवाने येऊन दर्शन दिले. त्यामुळे मी असे केले. स्वप्नात येऊन देवाने साक्षात्कार दिला आणि मी या ठिकाणी मंदिर बांधले. अशा या घटना घडलेल्या आपण ऐकल्या असतील. मात्र, यावर किती विश्वास ठेवायचा हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. एक मात्र खरे आहे की, काही तरी संकेत मिळतात त्यानंतरच असे प्रकार होत असतात.
त्यानंतर त्यांना त्या गोष्टीमध्ये यश देखील मिळाल्याचे पाहायला मिळते. पुरतानामध्ये आपण अशा गोष्टी ऐकल्या असतील की, दैवी साक्षात्कार झाला म्हणून मी येथे मंदिर बांधायला सुरुवात केली असली तरी संबंधित मंदिर किंवा ती गोष्ट अतिशय चांगल्या रीतीने पुढे कार्यरत राहते, हेच पाहायला मिळते.
या मालिकेवर प्रेक्षकांनी पूर्वीसारखेच प्रचंड प्रेम केले. त्यानंतर रामानंद सागर यांनी देखील उत्तर रामायण देखील पुन्हा केली. या मालिकेला देखील भरभरून प्रतिसाद मिळाला. काही दिवसांपूर्वीच रामानंद सागर यांची कृष्ण ही मालिका नव्याने पुन्हा सुरू झाली आहे.
या मालिकेनिमित्त पुन्हा जुन्या आठवणी नव्याने जागा झाल्या आहेत. या मालिकेबाबतचा एक किस्सा आम्ही आपल्याला आज सांगणार आहोत. काय झाला होता नेमका किस्सा… कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यासोबत तो जाणून घेऊया..
रामायण संपल्यानंतर रामानंद सागर यांच्या डोक्यात कृष्ण मालिका बनवण्याची कल्पना आली. त्यामुळे त्यांनी कृष्ण मालिका बनवण्यासाठी तयारी केली. मात्र, अनेक अभिनेत्यांचा शोध घेऊन देखील त्यांना कृष्ण मालिकेसाठी कोणीही मिळेनासे झाले. त्यानंतर त्यांची सर्वदमन बॅनर्जी यांच्यासोबत भेट झाली.
रामानंद सागर यांनी त्यांना कृष्णाच्या भूमिकेबाबत विचारणा केली. मात्र, बॅनर्जी यांनी यासाठी नकार दिला. आपण शिवभक्त असून आपल्याला ही भूमिका करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, तरीही सागर हे ऐकायला तयार होत नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यांना दहा दिवसाचा वेळ दिला आणि नंतर विचार करण्यास सांगितले.
त्यानुसार काही दिवस गेले. सात दिवस झाल्यानंतर एक दिवस बॅनर्जी हे दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांच्याकडे जात होते. त्यानंतर ते समुद्रकिनारी उतरून पायी जात होते. यावेळी त्यांना साक्षात कृष्ण नृत्य करत असल्याचे समोर दिसले. या प्रकाराने ती चांगलेच स्तब्ध होऊन भोवळ येऊन खाली पडले.
त्यांना जाग आल्यानंतर त्यांनी थेट रामानंद सागर यांचे घर गाठले आणि आपण कृष्ण मालिकेसाठी तयार असल्याचे सांगितले. एक प्रकारे त्यांना भगवान कृष्णाने साक्षात्कार देऊन या मालिकेत काम करण्यास सांगितले असल्याचे त्यावेळी चर्चा होती. आता याला कितपत खरे घ्यावे हा ज्याचा त्याचा विषय आहे.
मात्र, असे काही संकेत मिळाल्यानंतर बॅनर्जी यांनी ही भूमिका स्वीकारल्याचे सांगण्यात येते. खऱ्या आयुष्यात देखील अनेकांच्या जीवनात असे प्रसंग अनेकदा घडत असतात. कुठेतरी आपल्याला साक्षात्कार होतो आणि आपण एखादी चांगली काम करून जातो. त्यामागे देवी शक्ती असल्याचे सांगण्यात येते.
असाच हा प्रकार बॅनर्जी यांच्या सोबत घडला आणि त्यांनी कृष्ण मालिकेत काम केले. त्यानंतर ही भूमिका आणि ही मालिका एवढी गाजली की आजही लोक या मालिकेला विसरले नाहीत.