सलमान खानची होती बर्थडे पार्टी.. तिथे पोहचला सुशांत सिंह राजपूत… नंतर बघा काय झाले ? पहा व्हिडिओ

सलमान खानची होती बर्थडे पार्टी.. तिथे पोहचला सुशांत सिंह राजपूत… नंतर बघा काय झाले ? पहा व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आपल्याला सोडून जाऊन जवळपास एक आठवड्याचा कालावधी उलटला आहे. सुशांत जाण्यानंतर अनेक जण वेगवेगळ्या चर्चा करताना दिसत आहेत. कोणी त्यांचे म्हणणे समाज माध्यमांवर टाकत आहे, तर कोणी रस्त्यावर उतरून देखील विरोध प्रदर्शन करत आहेत.

सुशांत गेल्यानंतर बॉलिवूडमध्ये कसा व्यावसायिक वाद असतो आणि एखाद्याला कसे सोयीस्करपणे बाजूला करतात यावर मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली. यामध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचे नाव मोठ्या प्रमाणात समोर आले होते. याचे कारणही तसेच होते.

मात्र ब्रेक-अप झाल्यानंतर ते वेगळे राहत असल्याने पोलिसांनी तिला अधिक प्रश्न विचारले नाही. मात्र, सुशांत जाण्याच्या काही दिवस आधी त्याच्यासोबत राहणारी त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हीची पोलिसांनी तब्बल बारा तास चौकशी केली. त्यानंतर अनेक खुलासे झाल्याचे सांगण्यात येत होते.

असे असले तरी समाज माध्यमावर सुशांतच्या चाहत्यांनी सलमान खान आणि करण जोहर यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते. सुशांत गेल्यानंतर आठवड्यानंतर आता सलमान खानने याबाबत आपली चूपी तोडली आहे. त्याने आपल्या चाहत्यांना आवाहन केले आहे की, सुशांत सोबत आपला काही वाद नव्हता.

तरी माझ्या चाहत्यांनी त्याच्या चहात्याबरोबर उभे राहावे. सध्या ते कुठल्या परिस्थितीत आहेत हे आपण समजू शकता. त्यामुळे त्यांच्या भावनांची कदर करा. आपल्याला आता सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबासोबत राहण्याची गरज आहे, असे त्याने सांगितले आहे. हा वाद सुरू असतानाच सलमानच्या समर्थनात आता बॉलीवूड मधील कामगारांची एक संघटना देखील उभी राहिली आहे.

या संघटनेने सलमान खानच्या नावाने एक पत्र काढून सलमान खान नेहमीच गरजूंना मदत करत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सलमान खान याच्या वर टीका करणे अतिशय चुकीचे आहे. आम्ही सर्वजण सलमान खान सोबत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

सलमानने केला व्हिडिओ शेअर

गेल्या वर्षी सलमान खानचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. हा वाढदिवस सलमान खान याने पनवेल येथील फार्म हाऊसवर साजरा केला होता. या वाढदिवसाला सलमान खानने अनेकांना आमंत्रित केले होते. तसेच या आमंत्रितमध्ये सुशांत सिंह राजपूत याला देखील बोलावले होते.


या पार्टीला सुशांत आला होता. त्यानंतर त्याने सलमानसोबत जोरदार डान्स केला होता. आता हाच व्हिडिओ सलमान खान याने शेअर केला आहे. हा व्हिडिओ सलमान याने शेअर केल्याने आता आपोआपच याबाबतचा वाद संपुष्टात येण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *