रेडी चित्रपटात सलमान सोबत काम करणाऱ्या छोटे अमर चौधरीचे निधन, ‘या’ आजारापासून होता ग्रस्त

रेडी चित्रपटात सलमान सोबत काम करणाऱ्या छोटे अमर चौधरीचे निधन, ‘या’ आजारापासून होता ग्रस्त

सलमान खान सोबत रेडी चित्रपटात छोटे अमर चौधरी ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या मोहित बघेलचे निधन झाले आहे तो अवघ्या 27 वर्षाचा होता. कमी वयात तो सोडून गेल्यामुळे त्याच्या घरच्यांना धक्का बसला आहे आणि त्याचबरोबर बॉलिवूड देखील हादरले आहे.

मोहित बघेल यांच्या मृत्यूची बातमी आयुष्मान खुराना यांच्या ड्रीमगर्ल चित्रपटाचे दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोकचे वातावरण पसरले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहित बघेल यांना श्रद्धांजली अर्पण करीत आहे.

खूप कमी चित्रपटात काम केले असले तरी मोहितने सर्वांच्या हृदयात स्थान मिळवले होते. मोहित सलमान खान आणि असिन सोबत रेडी या चित्रपटात दिसला आहे. चित्रपटात मोहितने छोटा अमर चौधरीची भूमिका केली होती. 2019 मध्ये मोहित परिणीती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रासमवेत जबरिया जोडी चित्रपटातही दिसला आहे.

मोहित बघेल यांचा जन्म 7 जून 1993 रोजी मथुरा, उत्तर प्रदेशात झाला. बाल कलाकार म्हणून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘छोटे मिया’ या शोच्या माध्यमातून त्यांनी स्टँड अप कॉमेडी पासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. शोमध्ये त्याच्या कॉमेडीला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता, तरीही मोहित बघेल यांचा संघर्ष यानंतरही सुरूच होता. पण त्याला खरी ओळख मिळाली ती सलमान खानसह रेडी या चित्रपटातुन.

या आजराने झाले निधन

प्रसिद्ध अभिनेता आणि विनोदकार मोहित बघेल यांचे निधन झाले आहे. तो अवघ्या 27 वर्षांचा होता. मोहित बघेल खूप काळापासून कर्करोगासारख्या धोकादायक आजाराशी लढा देत होता. पण शेवटी त्याचा लढा अपूर्ण राहिला.

मोहित बघेल यांच्या निधनाबद्दल राज शांडिल्यने आपल्या ट्विटमध्ये त्याचे एक चित्र शेअर केले आणि लिहिले की, ‘मोहित मेरे भाई, इतक्या लवकर सोडण्याची काय गरज होती ? मी तुम्हाला सांगितले की संपूर्ण इंडस्ट्री तुमच्यासाठी थांबली आहे, लवकर या आणि आपण त्यानंतर सर्व काम सुरू होईल, तुम्ही खूप चांगले अभिनय कराल, म्हणून मी पुढच्या चित्रपटाच्या सेटवर तुमची वाट पाहत आहे … आणि तुम्हाला यावे लागेल ‘.

राज शांडिल्य यांचे ट्विट पुन्हा ट्विट करत बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रानेही मोहित बघेल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘काम करण्यासाठी काम करणाऱ्यामधील सर्वोत्कृष्ट लोकांपैकी तो एक होता. तो नेहमी आनंदी, सकारात्मक आणि प्रेरणादायक होता. याशिवाय सोशल मीडियावर मोहितच्या चाहत्यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *