सलमानने ऐश्वर्यापासून ते जॉन अब्रहामपर्यंत ‘या’ 9 कलाकारांचे करीयर केले बरबाद..पंगा घेणाऱ्यांसोबत करतो असे

बॉलिवूडमध्ये अभिनेता सलमान खान याला भाईजान, दबंग खान तसेच सुलतान असे संबोधले जाते. आजवर त्याने अनेकांना मदत देखील केली आहे. तसेच बीईंग ह्युमन या संस्थेच्या माध्यमातून त्याने अनेक संस्थांना देखील मदत केली आहे. दुष्काळग्रस्तांसाठी त्याने पाण्याच्या टाक्या देखील पाठवल्या होत्या. अनेक गरजूंना तो मदत देखील करतो. तसेच अनेकांचे बॉलिवूडमध्ये करिअर देखील त्याने केले आहे.
मात्र, सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर त्याच्यावर आरोप करण्यात येत आहेत. आदित्य पांचोली याचा मुलगा सुरज पांचोली याला चित्रपटात घेण्यासाठी सुशांत सिंह राजपूत याचा त्याने बळी दिला, असेही बोलले जात आहे. ऐश्वर्या रायपासून जॉन अब्राहमपर्यंत अनेकांचे सलमान खान याने करिअर बरबाद केले आहे. आम्ही आपल्याला या लेखात आज अशाच अभिनेते, दिग्दर्शकांबद्दल माहिती देणार आहोत.
२. ऐश्वर्या राय बच्चन : ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्यामध्ये हम दिल दे चुके सनम या चित्रपटानंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, दोघांमध्ये ब्रेक-अप झाल्यानंतर ऐश्वर्या रायने देखील सलमानने आपल्याला धमकावल्याचा आरोप केला. तसेच आपल्याला अनेकदा मारहाण केल्याचे तिने सांगितले. यानंतर सलमान खान याने तिचे करिअर बरबाद करून टाकले. शाहरुख खानसोबत चलते चलते या चित्रपटासाठी तिची निवड झाली होती. मात्र, या चित्रपटातून सलमान याने तिला काढून टाकण्यास भाग पाडले होते. त्यानंतर ऐश्वर्याला चित्रपट मिळणेच बंद झाले.
३. जॉन अब्राहम: जॉन अब्राहम याची बॉडी सलमान खान सारखीच आहे. दोघांनाही एका डान्स टूरसाठी परदेशात जायचे होते. मात्र, पैशावरून दोघांमध्ये खटके उडाले होते. त्यानंतर सलमान खान याने आपल्या स्टारडम’चा त्याला हिसका दाखवला. त्याने अनेक चित्रपटातून जॉनला बाहेर केले. त्यानंतर जॉन अब्राहमने स्वतःचे प्रॉडक्शन हाउस सुरू केले आणि चित्रपटाची निर्मिती सुरू केली. जॉन याने देखील सलमानवर आरोप केले होते की त्याने आपले करिअर बरबाद केले आहे.
४. ह्रितिक रोशन: ह्रितिक रोशन बॉलीवूड मधील मोठे नाव. मात्र, चित्रपट गुजारिश प्रदर्शित झाल्यानंतर सलमान याने त्यावर अश्लील कमेंट केली होती. यामुळे ह्रितिक रोशन चांगलाच भडकला होता. त्यानेही त्याला चांगलाच उत्तर दिले होते. त्यानंतर सलमान याने त्याचे करिअर बरबाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोशन घराण्याशी संबंधित असल्यामुळे आणि अभिनयाची उत्तम जाण असल्यामुळे ह्रितिक तो काहीही वाकडे करू शकला नाही.
५. संजय लीला भन्साळी : गुजारिश या चित्रपटानंतर संजय लीला भन्साळी यांच्यावर देखील सलमान खान याने कमेंट केली होती. मात्र, हे सर्व काही विसरून त्यांनी सलमान याला इन्शा अल्ला या चित्रपटासाठी साइन केले होते. मात्र, आपल्या बडेजावपणाचा वापर करून त्याने हा चित्रपट थंड बस्त्यात नेऊन टाकला होता. त्यानंतर संजय लीला भन्साळी यांना देखील खुप राग आला होता.
६. अर्जित सिंह : 2014 मध्ये झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान सलमान याने अर्जित सिंह याची चांगलीच खिल्ली उडवली होती. त्यानंतर अर्जित सिंह याचे देखील डोके भडकले होते. त्यानंतर त्याने देखील सलमान खानवर टीका केली होती. त्यानंतर सलमान खानने त्याला त्याच्या चित्रपटातील गाण्यातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. तसेच त्याला अनेक चित्रपटात गाणी मिळू नये यासाठी देखील प्रयत्न केले होते. मात्र, त्यानंतरही अर्जित सिंह याचे सलमान खान काहीही वाकडे करू शकला नाही.
७. अभिनव कश्यप : सलमान खानच्या सुपरहिट दबंग चित्रपटातचे दिग्दर्शन अभिनव कश्यप यांनी केले आहे. मात्र, त्यानंतर दोघांमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला. अभिनव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सलमान खानवर चांगलीच टीका केली. माझे करिअर बरबाद करण्यामागे सलमान खान याचा हात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गेल्या दहा वर्षापासून आपण या परिवाराच्या त्रासातून जात असल्याचे त्यांनी म्हटले.
८. सोनू निगम : काही दिवसांपूर्वीच प्रख्यात गायक सोनू निगम याने देखील सलमान खान याचे नाव न घेता त्याच्यावर जोरदार टीका केली होती. सोनू म्हणाला होता की, मी सलमान खान याची दादागिरी चांगलीच सहन केली आहे. सध्याचे नवीन गायक देखील त्याच्या दादागिरीचा सामना करत आहेत.
९. साहिल खान : स्टाईल या चित्रपटात काम केलेला अभिनेता साहिल खान याने देखील सलमान खान याच्यावर आरोप केले आहेत. एका बड्या खान परिवाराने आपले करियर बरबाद केल्याचे त्याने सोशल मीडियातून सांगितले आहे. साहिल खान याची बॉडी सलमान खान याच्यासारखीच आहे.आपल्याला अनेक चित्रपटातून सलमान खान यानेच काढल्याचा आरोप त्याने केला. त्यामुळे आता एकूणच सलमान खान बॉलीवूडच्या अनेक कलाकारांच्या निशाण्यावर आल्याचे दिसत आहे.