प्रविण तरडेंच्या ‘या’ चित्रपटाचा रिमेक बनवणार सलमान, साकारणार ही भूमिका?

प्रविण तरडेंच्या ‘या’ चित्रपटाचा रिमेक बनवणार सलमान, साकारणार ही भूमिका?

‘सैराट’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक समीकरणेच बदलून टाकली आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 100 कोटींचा व्यवसाय केला होता आणि अस करणारा सैराट हा पहिला मराठी चित्रपट होता. त्यामुळे सम्पूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या या मराठी चित्रपटाचा हिंदीमध्ये रिमेक करण्यात आला होता. पण हिंदी मधील चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.

आता सैराट पाठोपाठ तमाम जनतेच्या मनावर राज्य करणाऱ्या आणखी एका मराठी चित्रपटाचा रिमेक येणार आहे. हा रिमेक बॉलिवूडचा भाईजान करणार असल्याचे म्हटले जात आहे.

जमिनीला सोन्याचा भाव मिळत आहे, त्यामुळे शेती करून तोट्यात जाण्यापेक्षा जमीन विकून बक्कळ पैसा मिळवण्याचा हव्यास बाळगलेल्या तरुण पिढीवर ‘मुळशी पॅटर्न’ची कथा आधारलेली आहे. २०१८मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा सलमान आणि अरबाज खानसाठी स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. तेव्हा त्यांना हा चित्रपट प्रचंड आवडला होता. त्यामुळे त्यांनी तेव्हाच या चित्रपटाचा हिंदी रिमेकचा विचार  केला होता. आता ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटात हिंदी रिमेक पाहाला मिळणार असल्याने चाहते आनंदी आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.