सानिया मिर्झाचा खळबळजनक खुलासा, म्हणाली धोनीला पाहिले की मला माझ्या पतीची आठवण येते, हे आहे “कारण”

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने नुकतीच 15 ऑगस्टला अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून आपल्या चाहत्यांना एक आश्चर्याचा धक्का दिला. कुणालाच असे अपेक्षित नव्हते की धोनी असा तडकाफडकी निवृत्ती घेईल. पण धोनीच्या मनातलं कोण ओळखणार शेवटी धोनी तो धोनी. धोनीची हीच गोष्ट त्याला इतरांपेक्षा वेगळं बनवते.
दरम्यान, धोनीने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर हिंदुस्थानची टेनिस खेळाडू आणि पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब मलीकची पत्नी सानिया मिर्झा हिने प्रतिक्रिया दिली आहे. ‘स्पोर्ट्सकीडा’ला दिलेल्या मुलाखतीत सानियाने धोनीला शुभेच्छा दिल्या आणि त्याला पाहिले की मला माझ्या पतीची आठवण येते असेही म्हटले.
धोनीची इच्छा असती तर तो फेअरवेल सामना खेळला असता आणि मैदानावर उतरुन कारकिर्दीला अलविदा केले असते. परंतु त्याने शांतपणे यापासून दूर जात निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. आणि हीच बाब त्याला कॅप्टन कुल बनवते, असे 33 वर्षीय टेनिस खेळाडू सानिया मिर्झा म्हणाली. तसेच त्याने स्वतःसाठीच नाही तर देशासाठीही खूप काही कमावले, असेही सानिया म्हणाली.