संजूबाबाच्या प्रेमात वेडी झाली होती ही प्रसिद्ध अभिनेत्री, घरात लावले होते त्याचे पोस्टर.

चित्रपटाची शूटिंग सुरू असताना अभिनेता आणि अभिनेत्री जास्त काळ एकमेकांसोबत वेळ घालवत असतात. त्या दरम्यान त्यांच्यामध्ये जवळीक वाढणे स्वाभाविक असते पण कधी कधी ही जवळीक इतकी वाढते की त्याचे रूपांतर प्रेमात होते.
बॉलीवूड मध्ये ब्रेकअप आणि पॅचअप होणे ही काही नवीन गोष्ट नाही. रोज नवीन नवीन पॅचअप आणि ब्रेकअप बॉलिवूडमध्ये होत असतात. म्हणून आज आपण अशाच एका स्टोरी बद्दल बोलणार आहोत.
रविना टंडन संजय दत्तची चहाती असल्यामुळे तिच्या रूममध्ये चारही बाजूने तिने संजूबाबाचे पोस्टर लावले होते. रविणाने मुलाखतीत आणखी एक किस्सा सांगितला होता की, ‘क्षत्रिय चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जेव्हा मी हॉर्स रायडिंग करत होते तेव्हा मला घोड्याने खाली फेकले.
त्यामुळे माझा हात फ्रॅक्चर झाला होता शिवाय कानातून रक्त निघत होते, आणि मी बेशुद्ध पडली होती. शूटिंग जंगलात केले जात असल्यामुळे दूरवर कुठलेही रुग्णालय नव्हते, अशात मला संजूबाबाने दोन्ही हातात उचलून रुग्णालयापर्यंत नेले होते.
नव्वदच्या दशकात रविना टंडन एक आघाडीची अभिनेत्री होती. तिच्या सौंदर्याने अनेकांना वेड लावले होते. परंतु ती संजूबाबाच्या प्रेमात खूप वेडी झाली होती. रविनाने अजून एक किस्सा सांगितला होता की जेव्हा मी संजूबाबासोबत काम करत असे तेव्हा मनात एक भीती कायम असायची, म्हणजे काम करताना माझ्याकडून चूक होणार नाही ना?
पण या जोडीने एकापेक्षा एक हिट चित्रपट देत एक धमाकेदार जोडी ठरली होती. त्याकाळी सर्वात यशस्वी दोघांपैकी एक जोडी संजूबाबा आणि रविना टंडन ची होती.