शेवंताचा ‘नो मेकअप’ लूकमधील फोटो पाहून चाहते म्हणतात.

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या पहिल्या सिजन पेक्षा सद्या चालू असलेला दुसरा सिजन अधिक लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेने जशी प्रेक्षकांची मनं जिंकलीत, तसेच या मालिकेतील कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
या मालिकेत जेव्हा शेवंताची एन्ट्री झाली तेव्हा पासूनच ही मालिका प्रकाश झोतात आली आहे. मालिकेतील शेवंता आणि अण्णांच्या अदाकारीचे तर चाहते डाय हार्ट फॅन बनलेत. शेवंताची एन्ट्री झाल्यानंतर मालिकेची लोकप्रियता आणखीच वाढली.
कॉलेजमध्ये असतानाच अपूर्वाला अॅक्टिंगच्या ऑफर येणे सुरु झाले होते. पण अपूर्वाने या सगळ्या ऑफर धुडकावल्या होत्या. याचे कारण म्हणजे, अभिनयात तिला कुठलाही रस नव्हता.
खरे तर तिला एमबीए करायचे होते. पण अपूर्वाच्या आई-वडिलांची मात्र मुलीने अभिनयात जावे अशी इच्छा होती. नियतीने त्यांची ही इच्छा पूर्ण केली. कदाचित त्यामुळेच, अभिनय क्षेत्रात काम करणे हे माझ्या नशिबातच लिहिले होते, असे अपूर्वा नेहमी म्हणते.