सर्व पुरुष शर्टाच्या आत बनियन ‘का’ घालतात?

होय, जुन्या पिढीतील पुरुष अगदी अंगवळणी पडल्यासारखे शर्टाच्या आत बनियान घालतात. नवीन पिढीतील तरुण पुरुष शर्टाच्या आत बनियान घालणे म्हणजे ओल्ड फॅशन समजतात . तेंव्हा सर्वच पुरुष शर्टाच्या आत बनियान घालतात हे म्हणणे बरोबर नाही.
पुर्वीच्या काळी आजच्या सारखी सुबत्ता नव्हती . एका घरात खुप लोक राहायची. शेजार पाजारची लोक , पै पाहुणे हक्कानं घरी यायची. तेव्हा बाहेरून घरात आल्याबरोबर अंगातला शर्ट काढल्यास सर्व अंग उघडे पडते. ते वाईट दिसते व असभ्यपणाचे लक्षण मानले जाते.
म्हणजे पर्यावरण रक्षणाला हातभार लावायचे दूरच पण हानी पोहचविण्यास हातभार लावल्यासारखेच आहे. मी तरी ३ / ४ वेळा शर्ट घातल्याशिवाय धुण्यास टाकीत नाही.