शूटिंग सुरू असताना सलमान माझ्याशी फ्लर्ट करायचा, 30 वर्षांनी भाग्यश्रीचा खुलासा

1989 मध्ये सलमान खान आणि भाग्यश्रीचा ‘मैंने प्यार किया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट दोघांचा पहिला चित्रपट होता. या सिनेमातून प्रेक्षकांची मला जिंकणारी भाग्यश्री काही दिवसांपासून चर्चेत आहे. मैने प्यार किया हा भाग्यश्रीचा पहिला चित्रपट होता, या चित्रपटातून ती रातोरात स्टार झाली.
प्रत्येक अभिनेत्री तिच्या करियर मध्ये उभरत्या काळात लग्न करणं टाळतात. पण भाग्यश्री याला अपवाद ठरली. भाग्यश्री मे मैने प्यार किया या चित्रपटानंतर अवघ्या वर्षभराच्या आत प्रोड्युसर हिमालय दासानी याच्याशी लग्न केलं. या सिनेमाचं शूट सुरू होतं त्यावेळी सलमान खान माझ्याशी फ्लर्ट करत असे असा धक्कादायक खुलासा केला आहे.
भागश्री पुढे म्हणाली, ‘अशी एक वेळ होती जेव्हा दीड वर्षासाठी मी आणि हिमालय एकमेकांपासून वेगळे झालो होतो. त्यावेळी माझ्या मनात असा विचारही आला की, जर ते मला भेटलेच नसते आणि मी त्यांच्याशी लग्न केलं नसतं तर, हे सर्व जेव्हा मला आठवतं तेव्हा आजही मला खूप भीती वाटते.’ भाग्यश्रीच्या या खुलाशानं सर्वांना धक्का बसला होता. लग्नाच्या 30 वर्षांनंतर पहिल्यांदाच भाग्यश्री तिच्या लग्नाविषयी मोकळेपणानं बोलली.
भाग्यश्री आणि हिमालय यांच्या लव्ह स्टोरीबद्दल बोलायचं तर हे दोघं शाळेत असतानापासून एकमेकांना ओळखत होते. तेव्हाच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र असं म्हटलं जातं की भाग्यश्रीचे कुटुंबीय तिच्या लग्नाच्या विरोधात होते. पण मग सूरज बडजात्या, सलमान खान आणि काही जवळच्या मित्रमंडळींनी त्यांचं लग्न लावून दिलं मात्र याचा भाग्यश्रीच्या करिअरवर परिणाम झाला. ‘मैंने प्यार किया’नंतर तिला बॉलिवूडमध्ये फारसं यश मिळवता आलं नाही.