शूटिंग बंद असल्यमुळे शेतात घाम गाळतोय ‘हा’ बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

कोरोना महामारीमुळे सध्या सर्वच व्यवहार ठप्प पडले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कंपनी बंद झाल्याने मालकांनी अनेकांना नोकरीवरून काढून टाकलेले आहे. मात्र, या कठीण काळात जो मार्ग काढणार तोच तरून जाईल. असे काही चित्र सध्या आहे. मात्र, काही लोक शॉर्टकट अवलंबून करून आपले जीवन नाहक संप*वत आहेत.
मात्र, यावर मात करून सुद्धा जीवन जगता येते. असे काही उदाहरण आपल्या समाजामध्ये आहेत. अनेकजण गरिबांची भूक भागवत आहे, तर कोणी सध्या इतर काम करून जीवन जगत आहेत. नै*रा*श्य आल्यामुळे काही दिवसांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपला जीव गमावला. मात्र, त्यानंतर अनेकांनी याबाबत टीकाही केली.
अतिशय गरीब परिस्थितीतून वर आलेला अभिनेता हा बॉलीवूडचा मोठा कलाकार बनला आहे. तरीदेखील आज तो शेतात राबत असल्याचे चित्र दिसत आहे. आपण नवाजुद्दीन सिद्दीकी याला अनेक चित्रपटातून पाहिले असेल. काही दिवसापूर्वीच त्याच्या पुतणीने त्याच्या भावावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. तसेच त्याच्या पत्नीचे प्रकरण देखील खूप गाजले होते.
मात्र, असे असले तरी त्याने त्याच्या फिल्मी करिअरवर कधीही परिणाम पडू दिला नाही. आपल्या भावाच्या कृत्याचे त्याने खंडन करून हे वृत्त चुकीचे असल्याचे सांगितले होते. नवाजुद्दीन सिद्दिकी याने चित्रपटातून जबरदस्त भूमिका केलेल्या आहेत. माझी या चित्रपटांतून त्याने सर्वांना चकित करणारा अभिनय केला होता. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ठाकरे हा चित्रपट देखील त्याने साकारून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
त्याने अनेक चांगले चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या मुजफ्फरनगरमधील त्याच्या गावात अडकले आहेत. ईदसाठी तो गावाकडे गेला होता आणि त्यानंतर कोरोणा महामारी चा देशात उद्रेक झाला. त्यानंतर लॉक डाऊन ची परिस्थिती देशात निर्माण झाली. आजही अशीच परिस्थिती सर्वत्र आहे. त्यामुळे तो गावाकडे अडकलेला आहे.
गावाकडे तो आपली शेती सध्या पहात आहे. त्याला काही एकर शेती गावाकडे आहे. त्यामुळे तो शेतात राबताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने आपला एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करून आपण शेतात काम करत असल्याचे दाखवून दिले. यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
तसेच हा जमिनीशी जोडलेला माणूस आहे, अशीही एकाने टिपणी केली. एकूणच नवाजुद्दीन सिद्दीकी याचे शेतात काम करत असल्यामुळे कौतुक होत आहे. तसेच त्याचा हा व्हिडिओ अनेकांना प्रेरणा देणारा आहे.