श्रीदेवीच्या ‘या’ गोष्टीमुळे अनिल कपूर व बोनी कपूर यांच्यात झाला होता मोठा वाद…

बॉलीवूडमध्ये कपूर घराणे हे अव्वल घराणं. जेव्हापासून चित्रपट बनायला सुरुवात झाली तेव्हापासूनच कपूर घराण्याचे नाव चर्चेत आहे. कपूर घराणे म्हटले की, पृथ्वीराज कपूर, राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर, ऋषी कपूर, रणबीर कपूर, करीना कपूर यांची नावे समोर येतात.
मात्र, एक कपूर घराणे वेगळे आहे, ते म्हणजे बोनी कपूर आणि अनिल कपूर यांचे. दोन्ही कपूर यांचा एकमेकांशी संबंध नाही. मात्र, दोन्ही कपूर घराण्याचे बॉलिवुडमध्ये खूप नाव गाजलेले आहे. बोनी कपूर यांनी 1987 मध्ये मिस्टर इंडिया या चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट आपल्याला आठवत असेलच.
या चित्रपटादरम्यान बरेच वाद झाले होते. हे फार कमी लोकांना माहिती आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर कपूर यांनी केले होते. तर या चित्रपटात बोनी कपूर यांनी पैसे लावले होते. त्याच बरोबरीने अनिल कपूर यांनी देखील चित्रपटासाठी काही पैसा लावला होता.
ज्यावेळी चित्रपटातील अभिनेत्रीची निवड करण्याचे ठरले त्यावेळी अनेक अभिनेत्रींची नावे समोर आली. मात्र, श्रीदेवीला या भूमिकेसाठी घेण्यात आले होते. काही दिवस श्रीदेवीने भूमिकेबाबत सांगितले नव्हते.
म्हणून अनिल कपूर चित्रीकरण अर्धवट सोडून गेले..
या चित्रपटासाठी श्रीदेवी हिने त्या काळी दहा लाख रुपयांची मागणी केली होती. ही बाब जेव्हा अनिल कपूर यांना समजली तेव्हा त्यांनी बोनी कपूरला याबाबत जाब विचारला होता. त्या काळी दहा लाख रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम होती.
मात्र, श्रीदेवी एवढ्या पैशासाठी अडून बसली होती. त्यावर काहीही तोडगा निघत नव्हता. मग बोनी कपूर यांनी श्रीदेवीला अकरा लाख रुपये देऊ केले. त्यानंतर श्रीदेवीने हा चित्रपट साईन केला होता. तसेच त्यावेळी श्रीदेवीच्या आईची तब्येत ठीक राहत नव्हती. त्यामुळे बोनी कपूर यांनी श्रीदेवीच्या आईला तिकीट काढून अमेरिकेला उपचारासाठी पाठवले होते.
ही बाब जेव्हा अनिल कपूर यांना समजली त्यावेळी ते प्रचंड अस्वस्थ झाले होते. त्यामुळे मिस्टर इंडियाचे चित्रीकरण सोडून ते निघून गेले होते. जवळपास एक महिना चित्रपटाचे चित्रीकरण थांबले होते. त्यानंतर बोनी कपूर यांनी समजूत काढून अनिल कपूर यांना चित्रपटासाठी परत तयार केले होते.
मात्र, आणि त्यांनी चित्रपटातील नफ्यावर मोठा दावा सांगितला होता. एकूणच या घडामोडीनंतर काही काळ चित्रपटाचे प्रदर्शन लांबले. मात्र, त्यानंतर चित्रपट प्रदर्शित झाला. प्रदर्शनानंतर हा चित्रपट प्रचंड गाजला होता. कोट्यवधी रुपये त्यावेळेस चित्रपटाने कमावले होते. आजही हा चित्रपट आबालवृद्धांमध्ये आवडता आहे.