‘हा’ प्रसिद्ध मराठी अभिनेता आहे श्रुती मराठेचा पती आहे, दिसायला आहे खूपच हँडसम

आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री श्रुती मराठेने मराठी तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही तिने आपल्या अभिनयाने फॅन्सच्या मनात जागा निर्माण केली आहे. अभिनय व सौंदर्याची खान असलेली श्रृती मराठेने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे. मराठीत प्रसिद्ध असलेल्या श्रुतीने तमिळ सिनेमा ‘इंदिरा विजहा’ने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
श्रुतीने तमिळमधील ‘प्रेम सूत्र’, मराठीतील ‘सनई चौघडे’सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती ‘श्रुती प्रकाश’ या नावाने प्रसिद्ध आहे. श्रुतीचा पतीदेखील एक प्रसिद्ध अभिनेता आहे.