बॉलीवूडच्या सिंघमने खरेदी केली जगातली सर्वात महागडी कार ! पाहा कोणती आहे कार..!

बॉलीवूडच्या सिंघमने खरेदी केली जगातली सर्वात महागडी कार ! पाहा कोणती आहे कार..!

या जगामध्ये महागड्या कार खरेदी करण्याचा शोक अनेकांना असतो. तसेच भारतात देखील महागड्या कार परदेशातून आणून त्या वापरणे अनेकांना आवडते. क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर याला तर कारचे एवढे प्रेम आहे ते सर्वांनाच माहिती आहे. सचिन रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावरून कार चालवत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे.

सचिनने याबाबत अनेकदा सांगितले आहे. बॉलिवुडमध्ये देखील असे अनेक कलाकार आहेत की जे महागड्या कार खरेदी करतात. अजय देवगन हे बॉलिवूडला भेटलेली एक देणगीच म्हणावी लागेल. अजय देवगन याने आजवर अनेक चित्रपटात काम केले असून त्याला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. फुल और काटे या चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर त्याने आजवर कधीही मागे वळून पाहिले नाही.

गाडीचे वैशिष्ठे अशी आहेत..

अजयला गाडीच्या आत बसलेला किंवा ड्रायव्हिंग करताना पाहिले गेले नाही, ही कार खरेदी करण्याबाबत अजय देवगण कडून अजूनही कोणतेही वक्तव्य आलेले नाही. परंतू एका व्यक्तीने पार्किंगमध्ये पार्क केलेल्या कारचा फोटो काढला. अधिक माहिती काढल्यानंतर अजय देवगन कारचा मालक असल्याचे आढळून आले.

महागड्या आणि शानदार एसयूव्ही रोल्स रॉय क्लिनिनमध्ये ६.८ लीटरचे ट्विन चार्जर व्ही १२ पेट्रोल इंजिन जोडलेले आहे जे ५६० बीएचपी आणि ८५० एनएम टॉर्क देते. कारच्या आत ८-स्पीड ऑटोमैटिक गियरबॉक्स आहे. कार फक्त ० ते १०० किमी पर्यंत अंतर ५ सेकंदात कापू शकते. कारची टॉप स्पीड २४९ किलोमीटर प्रति तास आहे. कारमध्ये सस्पेंशन सोबत ३६० डिग्री कॅमेरा सिस्टम देखील आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *