सोनाली कुलकर्णीचा ‘विनामेकअप’ लूक पाहून चाहते म्हणतात…..!

सोनालीने आतापर्यंत विविध चित्रपटात विविध प्रकारच्या भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सोनालीला सोशल मीडियावर वेळ घालवायचा खूप आवडतो म्हणून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात ती असते.
तिच्या वयक्तिक जीवनाबद्दल अपडेट ती सोशल मीडियावर शेअर करत असते. त्याच बरोबर ती तिच्या चित्रपटाचे चित्रीकरण कुठे सुरू आहे, ती चित्रीकरणातून वेळ काढून कुठे व्हेकेशनला गेली आहे या प्रत्येक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना सांगत असते.
सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे.
नटरंग या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते. या चित्रपटानंतर तिला मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सराच म्हटले जाते. तिने अंजिठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. बकुळा नामदेव घोटाळे या तिच्या पहिल्या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते.