स्टार कीड असूनही ‘या’ अभिनेत्यांच्या हाताला नाही काम..नंबर ६ आहे दिग्गज सुपरस्टारचा मुलगा…

स्टार कीड असूनही ‘या’ अभिनेत्यांच्या हाताला नाही काम..नंबर ६ आहे दिग्गज सुपरस्टारचा मुलगा…

अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा जग सोडून गेल्यानंतर सध्या बॉलीवूडमध्ये घराणेशाहीबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बॉलिवूडमध्ये एखाद्याचे करियर संपवण्यासाठी घराणेशाही कशी कारणीभूत ठरते, याबाबत समाज माध्यमावर विविध पैलू उमटताना दिसत आहेत. मात्र, असे असले तरी घराणेशाहीचा प्रभाव काही अभिनेत्यांवर पडलेला नाही.

स्टार कीड असून देखील या वेळी त्यांना आजवर अफलातून असे यश मिळालेले नाही. यातील काही अभिनेते तर हे दिग्गज अभिनेत्यांची मुलं आहेत. आम्ही आपल्याला या लेखांमध्ये आज अशाच स्टार कीड असलेल्या मुलांबाबत माहिती देणार आहोत..

१. सोनम कपूर : दिग्गज अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी असलेल्या सोनम कपूर हिने सावरिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात अभिनयपेक्षा तिच्या अफेअरची चर्चा अधिक रंगली होती. या चित्रपटात रणबीर कपूर हा मुख्य कलाकार होता. गेल्या काही दिवसांपासून तिच्याकडे अजिबात चित्रपट नाहीत. त्यामुळे तिने लग्न केले आहे. सध्या ती घरीच आहे.

२.अर्जुन कपूर : अर्जुन कपूर हा दिग्गज अभिनेते बोनी कपूर यांचा मुलगा होय. अर्जुन कपूरने काही चित्रपटात काम केले. मात्र, त्याला यथातथाच यश मिळाले. सध्या तो मलायका अरोरासोबत असलेल्या संबंधामुळे चर्चेत आहे. दोघेही सध्या एकत्र राहत आहेत. त्याचा संदीप और पिंकी फरार हा चित्रपट मार्च महिन्यात प्रदर्शित होणार होता. मात्र, लॉक डॉन मुळे तो आता डब्यात अडकला आहे.
त्यामुळे सध्या तो देखील घरीच आहे.

३.तुषार कपूर : दिग्गज अभिनेते जम्पिंग जॅक जितेंद्र यांचा मुलगा असणारा तुषार कपूर याने यथातथाच यश बॉलीवूडमध्ये मिळवळे आहे. काही अपवादात्मक चित्रपट सोडले तर त्याच्या वाट्याला अपयश आले आहे. यात रोहित शेट्टी यांच्या गोलमाल समावेश करावा लागेल. या उलट त्याची बहीण एकता कपूरने मालिकांच्या माध्यमातून चांगले यश मिळवले आहे.

४.अक्षय खन्ना : एकेकाळी मोठा पडदा दणाणून सोडणारे अभिनेते विनोद खन्ना यांचा हा मुलगा होय. अक्षय खन्ना याला देखील काही मोजक्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवण्याची संधी मिळाली. मात्र, त्याने असे मोठे यश मिळाल्याचे ऐकिवात नाही. सध्या अक्षयकडे काहीही काम नाही.

५. बॉबी देओल : बॉलिवूडचे कलाकार धर्मेंद्र यांचा हा मुलगा होय. बॉबी याने बरसात या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात ट्विंकल खन्ना दिसली होती. या चित्रपटामध्ये त्याला यश मिळाले होते. त्यानंतर बॉबी याला काही मोजक्याच चित्रपटात यश मिळाले आहे. त्यामुळे बॉबी याला देखील काही प्रमाणात अपयशी ठरला आहे.

६. अभिषेक बच्चन : महानायक असलेल्या अमिताभ बच्चन यांचा हा मुलगा एकूणच अभिनयाची पार्श्वभूमी असलेल्या अभिषेक बच्चन याने अतिशय सुमार कामगिरी बॉलिवुडमध्ये केली आहे. अभिषेकच्या नावावर एखादाच चित्रपट हिट आहे. ऐश्वर्या रायसोबत लग्न केल्याने तो अधिक चर्चेत आला होता. अभिषेक कडे सध्या काहीही काम नाही.

७. सोनाक्षी सिन्हा : बॉलीवूडचे शॉटगन शत्रुघन सिन्हा यांची मुलगी असलेल्या सोनाक्षी सिन्हा हिने सलमान खानसोबत दबंग या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर काही चित्रपटात अभिनय केला होता. मात्र, त्यानंतर तिला फार मोठे असे यश मिळाले नाही. सध्या ती जाहिरातीच्या माध्यमातून काम करत आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *