भाड्याची खोली ते कोटींचा स्वत:चा बंगला, पाहा बॉलिवूडमधील या प्रसिद्ध गायिकाचा थक्क करणार प्रवास

भाड्याची खोली ते कोटींचा स्वत:चा बंगला, पाहा बॉलिवूडमधील या प्रसिद्ध गायिकाचा थक्क करणार प्रवास

बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर नेहमीच सोशल मीडियावर कोणत्यान कोणत्या कारणासाठी चर्चेत असते. आता तिने अशी माहिती शेअर केली आहे की त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वास्तविक, नेहा कक्कडने ऋषिकेशमध्ये एक अतिशय छान असा बंगला विकत घेतला आहे, ज्याचे फोटो तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहेत.

ऋषिकेश इथल्या बंगल्याची सुंदर छायाचित्रे शेअर करण्याबरोबरच तिने एक प्रेरणादायी गोष्ट देखील सांगितली आहे. नेहा कक्कर यांच्या बंगल्याचे फोटो आतापर्यंत 17 लाखाहून अधिक वेळा पाहिले गेले आहेत. नेहा कक्करने तिच्या नवीन बंगल्याच्या फोटो सोबत जुन्या घराचे फोटोही शेअर केले.

खूप थोड्या लोकांना हे माहित असेल की नेहा चित्रपट जगतात येण्यापूर्वी जागरणाच्या कार्यक्रमात आपल्या बहिणी आणि भावासोबत गाणी म्हणायची.’इंडियन आयडॉल’ मध्ये स्पर्धक म्हणून हजेरी लावल्यानंतर नेहाला यश मिळालं आणि त्यानंतर ती यशाच्या पायर्‍या एक-एक चढत झाली.

‘इंडियन आयडॉल’ मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतल्यानंतर नेहाने’ नेहा द रॉक स्टार ‘नावाचा संगीत अल्बम काढला. हा अल्बम 2008 मध्ये आला होता. यानंतर नेहा सिनेमा जगतात काम करू लागली.

या पुढे नेहा आपल्या प्रेक्षकांसाठी काय घेऊन येत आहे ते पाहावे लागेल. आम्ही आशा करतो कि हि माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणीना शेअर करायला विसरू नका.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *