करोडो रु’पयांच्या मालकीण आहेत सनी आणि बॉबी देओल यांच्या बायका, मुंबईमध्ये ‘हे’ काम करून कमवितात बक्कळ पै’सा…

करोडो रु’पयांच्या मालकीण आहेत सनी आणि बॉबी देओल यांच्या बायका, मुंबईमध्ये ‘हे’ काम करून कमवितात बक्कळ पै’सा…

बॉलिवूडमध्ये असे काही घराणी आहेत की ज्यांचा पार पूर्व पासून बॉलिवूडमध्ये दबदबा निर्माण झालेला आहे. यामध्ये राज कपूर यांचे कुटुंबाचे नाव घ्यावे लागेल. कपूर फॅमिली मधील सर्व जण मोठे मोठे अभिनेते आहेत. त्यामध्ये राजकपूर पासून ऋषी कपूर, रणबीर कपूर, शशि कपूर, करिष्मा कपूर, करीना कपूर यांचे नाव घ्यावे लागेल.

त्यानंतर बॉलिवूडमध्ये असे काही कुटुंब आहेत की, त्यांचा देखील वरचष्मा कायम राहिलेला आहे. यामध्ये धर्मेंद्र यांचे नाव घ्यावे लागेल. धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटात काम करून आपली कारकीर्द मोठ्या प्रमाणात सावरली आहे. धर्मेंद्र यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये दोन लग्न केले आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कोर असे आहे.

प्रकाश कोर यांना दोन मुले आहेत. त्या मुलांचे नाव सनी देओल आणि बॉबी देओल असे आहेत. बॉबी देओल आणि सनी देओल यांनी देखील बॉलिवूडमध्ये खूप नाव कमावले आहे सनीने तर अनेक चित्रपटातून आपल्या भूमिकेने चार चांद लावले आहेत. सनीच्या नावावर खूप हिट असे चित्रपट आहेत. सध्या तो 64 वर्षां चा आहे. तरीदेखील अजून तो तेवढाच फिट आणि तंदुरुस्त आहे.

बॉबी देओल याने देखील बरसात या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. काही दिवसांपूर्वी आलेल्या आश्रम या वेब सिरी मधून त्याने आपल्या भूमिकेत सर्वांनाच मोहित करून टाकले होते. या वेबसीरीज मध्ये अनेक चांगले पात्र होते. या वेबसिरीज ची निर्मिती प्रकाश झा यांनी केली होती. कोरोना महामारी मुळे चित्रपटावर संक्रांत आली होती. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणात चालू होते.

त्यामुळे मोठे दिग्दर्शक देखील या प्लॅटफॉर्मवर आपल्या वेबसिरीज घेऊन आलेले आहेत. आता वेब सिरीज चा जमाना सुरू झालेला आहे. चित्रपट गृहाकडे लोक जास्त प्रमाणात जात नाहीत. त्यामुळे मोबाईलवर चित्रपट पाहतांना अनेकांना सुकर होत असते. ही वेबसिरीज एवढी गाजली की याचे दोन भाग प्रसारित झालेले आहेत.

मात्र, या वेब सिरीजच तिसरा भाग देखील लवकर प्रदर्शित करावा, अशी चाहत्यांनी मागणी केली आहे. यामध्ये बॉबी देवल याने साकारलेली काशीपूर वाले बाबा ची भूमिका केलेली आहे. त्यामुळे या वेबसिरीज चा तिसरा भाग देखील लवकरच प्रसारीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज आम्ही आपल्या लेखामध्ये बॉबी देओल आणि सनी देओल यांच्या पत्नी बाबत माहिती देणार आहोत.

सनी देओल याची पत्नी चे नाव पूजा देओल आहे. पूजा ही लाईमलाईट पासून दूर राहते. ती कधीही कुठल्याही पार्टीमध्ये दिसत नाही.तर याउलट बॉबी देवल याच्या पत्नीचे आहे. बॉबी देओल ची पत्नीचे नाव तान्या आहे. ती एक बिझनेस वुमन आहे. बॉबी त्याची पत्नी अनेकदा एकत्र दिसत असते. सुरुवातीला ते एका रेस्टॉरंट मध्ये भेटले होते. बरसात चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर बॉबीने तिच्यासोबत तातडीने लग्न केले होते.

ती एक सक्सेसफुल बिझनेस वुमन आहे. या सोबत ती इंटेरियर डिझायनर देखील आहे. बॉलिवूडमध्ये तान्या देओलच्या फर्निचरला मोठ्या प्रमाणात मागणी असते. तिचे हे फर्निचर अतिशय महागडे असते. तसेच ती पती बॉबी सोबत मिळून मुंबईमध्ये एक रेस्टॉरंट सुद्धा चालवत असल्याचे सांगण्यात येते. ज्यावेळी बॉबी देवल याची कारकीर्द घसरणीला लागली होती. त्यावेळी तान्या हिने त्याला खूप मदत केली होती.

तसेच त्याची फायनान्शियल बाजू देखील सांभाळली होती. बॉबी देओल डिप्रेशनमध्ये गेला होता त्यावेळेस तान्या हिने त्याला खूप सपोर्ट केला होता. दोघेही एकमेकांच्या सोबत आणि एकत्र फिरताना दिसतात. तसेच ती कॉस्च्युम डिझायनर देखील आहे. जुर्म आणि नन्हे जैसलमेर या चित्रपटासाठी तिने कॉश्च्युम डिझाइन केले होते. बॉबीला दोन मुले आहेत. एक आर्यमान आहे तर दुसऱ्याच नाव धरम असे आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *