…म्हणून सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला होऊ शकते दहा वर्षांची जेल..! ‘हे’ आहे कारण.!

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत हे जग सोडून आता दहा दिवसाच्यावर लोटले आहेत. मात्र, त्याने हे जग का सोडले याबाबत चर्चा अजून देखील थांबताना दिसत नाहीत. याबाबत दररोज नवीन नवीन खुलासे समोर येताहेत. इतका मोठा अभिनेता असलेला सुशांत याने असे कृत्य का केले. याबाबत देखील चर्चा होत आहे.
या घटनेनंतर मनोस्पचार तज्ञ देखील आपल्या भूमिका मांडत आहेत. जळगाव जिल्ह्यातील एका शाळकरी मुलाने तर सुशांत सिंह जाण्याचा धसका घेऊन स्वतःला संप*वू*न घेतल्याची घटना घडली. त्यानंतर अशा अनेक घटना पाहायला मिळत आहेत. सुशांत सिंह राजपूत याने पवित्र रिश्ता या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.
त्याने आपल्या चाहत्यांना आवाहन करून सांगितले की, सुशांतच्या चाहत्यांना विनाकारण त्रास देऊ नका. ते सध्या वेगळ्या त्रासात आहेत. एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये सुशांत सिंह राजपूत काम करत होता. मात्र, या चित्रपटात सलमान खान याला त्याच्या ओळखीच्या अभिनेत्याला घ्यायचे होते. मात्र, करण जोहर याने सुशंतची निवड केली.
त्यामुळे सलमान खान हा संतापल्याचे सांगण्यात येते. मात्र, असे असले तरी सलमान खान याने काही दिवसांपूर्वी व्हिडिओ शेअर करून आपल्या बर्थडे पार्टीला सुशांत हजर असल्याचे सांगितले. त्यामुळे याबाबतची चर्चा आता रंगताना दिसत आहे. मात्र, अलीकडेच खुलासा झाला आहे की, महेश भट या प्रकरणात समाविष्ट असल्याचे देखील सांगण्यात येते.
याचे कारण म्हणजे त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ही महेश भट च्या अतिशय जवळची असल्याचे सांगण्यात येते. महेश भट्ट यांनी तिला जिलेबी या चित्रपटात सोबत घेतले होते. आता रिया चक्रवर्ती ही सुशांत ची बिझनेस पार्टनर असल्याचे देखील बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी चौकशी केली होती.
आता या प्रकरणात मुजफ्फरनगरच्या एका न्यायालयात गुन्हा दाखल झालेला आहे. मुजफ्फरनगर चे कुंदन कुमार यांनी याविरोधात तक्रार करून 420 306 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, सुशांत याची रिया ही बिझनेस पार्टनर होती. तसेच तिने त्याचे आर्थिक नुकसान केले.
तसेच त्याचे नाव वापरून बॉलिवूडमध्ये ती मोठी झाली आणि त्यानंतर त्याला ती सोडून गेली. त्यामुळे त्याला मानसिक तणाव आला. यामुळे त्यांनी हे जग सोडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आता हे प्रकरण सिद्ध झाल्यास रिया चक्रवर्ती ला दहा वर्षाची होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता याबाबतचा निकाल काय लागतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल..