सुशांत सिंह राजपूतच्या आ त्म ह त्येवरुन उसळलेल्या वादावर राज ठाकरेंचा खुलासा, म्हणाले…

सुशांत सिंह राजपूतच्या आ त्म ह त्येवरुन उसळलेल्या वादावर राज ठाकरेंचा खुलासा, म्हणाले…

सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर त्याच्या जाण्याबाबत अनेक चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या प्रकरणी जवळपास 28 जणांची चौकशी पोलिसांनी केली आहे. यात त्याची माजी प्रेयसी अंकिता लोखंडे, रिया चक्रवर्ती यांचा देखील समावेश आहे. तसेच त्याच्यासोबत शेवटच्या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री संजना सिंघवी हिचा देखील समावेश आहे.

यात सलमान खान याचे नाव देखील समोर आले होते. तसेच यशराज बॅनरसह अनेक मोठ्या प्रोडक्शन हाऊसचे नावदेखील समोर आल्याचे पाहायला मिळाले होते. आता यामध्ये राजकीय पक्षाचे नाव सुद्धा जोडले जाऊ लागले होते. काही दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नावाने एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होती. त्याबाबत आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्विट करून खुलासा केला आहे.

सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाची बातमी कळताच त्याचे वडील के. सिंह बेशुद्ध होऊन कोसळले होते. त्याचे कुटुंब बिहारमधील पूर्णिया येथील रहिवासी आहेत. 2000 मध्ये ते दिल्लीत स्थायिक झाले होते. 2002 मध्ये त्याच्या आईचे निधन झाले होते. त्याची बहीण राज्यस्तरीय क्रिकेटपटू आहे. त्याला चार बहिणी आहेत. सुशांत याचादेखील विवाह ठरला होता.

नोव्हेंबरमध्ये तो लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, त्या आधीच ही दुर्घटना घडली. सुशांत सिंह वांद्रे येथील फ्लॅटमध्ये राहत होता. 2022 पर्यंत त्याने फ्लॅटबाबत करार केला होता. या फ्लॅटसाठी तो दर महिन्याला तब्बल साडेचार लाख रुपये भाडे द्यायचा. मात्र, पोलिसांनी सर्व बाजूंनी या प्रकरणाची चौकशी केली. पोलिसांनी त्याच्या बँक खात्याची माहिती देखील घेतली आहे.

त्याच्या बँक खात्यामध्ये तब्बल दहा कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तो आर्थिक तणावात नव्हता, असे देखील स्पष्ट होत आहे. त्यामुळे त्याच्या निधनाचे नेमके कारण तरी काय? याबाबत आता पोलिसांसमोर मोठा प्रश्न पडला आहे. मात्र, याबाबतचे सत्य लवकरच समोर येईल, असे पोलिसांना विश्वास वाटत आहे.

मात्र, असे असले तरी इतर बॉलिवूड अभिनेत्यांच्या निधनाप्रमाणे सुशांत प्रकरणही काही दिवसानंतर थंड होईल, असे देखील काहींना वाटत आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणात महाराष्ट्रातच नव्हे तर देशात दबदबा असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नावाने एक पोस्ट फिरत होती. या पोस्टमध्ये सुशांत याच्या निधनावर वक्तव्य करण्यात आले होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची चित्रपट सेना ही बॉलीवुडमध्ये कार्यरत आहे. या संघटनेचा बॉलीवूडमध्ये मोठा प्रभाव आहे. या संघटनेशी संबंधित वक्तव्य सुशांतच्या बाबत करण्यात आले होते. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रक काढून खुलासा केला आहे. राज ठाकरे म्हणाले की, सुशांत सिंह राजपूत याच्या बाबतीत गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाव जोडले जात आहे.


मात्र, मी आपल्याला सांगू इच्छितो आहे की, या प्रकरणाशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काहीही देणे घेणे नाही. या प्रकरणाची पक्ष कुठलीही जबाबदारी घेत नाही. त्यामुळे आमच्या पक्षाचे नाव विनाकारण याप्रकरणाशी जोडू नये, असा इशाराही त्यांनी अनेकांना दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आल्याने पडदा पडण्याची शक्यता आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *