Sushant Birth Anniversary : सुशांतची Ex गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनं शेअर केला ‘अनसीन’ व्हिडीओ ! सोशल मीडियावर तुफान व्हा’यरल…

Sushant Birth Anniversary : सुशांतची Ex गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनं शेअर केला ‘अनसीन’ व्हिडीओ ! सोशल मीडियावर तुफान व्हा’यरल…

अभिनेत्री अंकिता लोखंडेचे २०१६ साली सुशांत सिंग राजपूतसोबत ब्रेकअप झाले आणि तिने विकी जैनसोबत नवीन आयुष्याला सुरूवात केली आहे. मात्र आजही तिला सुशांत सिंग राजपूतची आठवण येते. मकर संक्रांतीच्या निमित्ताने अंकिता लोखंडेला अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आठवण आली असून तिने पुन्हा एकदा तिच्या अवस्थेबद्दल सांगितले आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या अशा अचानक जाण्याने साऱ्यांनाच ध क्का बसला. मात्र या सगळ्यात जास्त सफर झाली ती सुशांतची एक्सगर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे. अंकिता लोखंडे आजही सुशांतला विसरू शकलेली नाही. बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत याची आज 35 वी बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी आहे. सुशांतचा जन्म 21 जानेवारी 1986 मध्ये पटण्यात झाला होता.

या व्हिडीओचे एडिटिंग तन्मय खुटलने केले आहे. या व्हिडीओवर टेलिव्हिजन आणि बॉलिवूडमधील सेलिब्रेटींसोबत सुशांतचे चाहते कमेंट करत आहेत. अंकिता विकी जैनसह असलेल्या रिलेशनशिपमुळे सध्या चर्चेत आहे. लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. अंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती.

दोघांनी एकता कपूरची मालिका पवित्र रिश्तामध्ये सोबत काम केलं होतं आणि यादरम्यान दोघांची मैत्री प्रेमात बदलली. ही मालिका सुपरहिट ठरली होती. त्यानंतर अंकिता-सुशांत बराच वेळ सोबत घालवू लागले. त्यानंतर दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. पुढे 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअप होण्यामागे वेगवेगळी कारणे सांगितली गेली. पण तो भू तकाळ झाला आणि विकी हा अंकिताचा वर्तमान आहे.


नंतर दोघे ‘झलक दिखला जा’च्या दुसऱ्या सीझनमध्ये सोबत दिसले होते. व्हॅलेंटाइन डे च्या खास एपिसोडमध्ये सुशांतने अंकिताला स्टेजवरच प्रपोज केलं होतं. सुशांतने अंकिताला पुढील सात जन्माची साथ मागितली होती. ज्यानंतर ज्युरीमध्ये बसलेल्या प्रियांका चोप्राने त्याला विचारले होते की, काय तू नॅशनल टीव्हीवर अंकिताला विचारले की, तू माझ्यासाठी लग्न करशील का?

सुशांत यावर हो म्हणाला तर प्रियांकानेही अंकिताला यावर उत्तर मागितलं. यावर अंकितानेही सुशांतला लग्नासाठी होकार दिला होता. पण काही करणास्तव पुढे जाऊन त्याचे ब्रेकअप झाले. पण आज अंकिताने सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आता या व्हिडीओवर टेलिव्हिजन आणि बॉलिवूडमधील सेलिब्रेटींसोबत सुशांतचे अनेक चाहते देखील कमेंट करत आहेत आणि आपल्या लाडक्या सुशांतच्या आठवणींना ते उजाळा देत आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *