सुशांतच्या ‘त्या’ 4 डायऱ्या पोलिसांच्या हाती, मिळाली ‘ही’ महत्त्वाची माहिती

सुशांतच्या ‘त्या’ 4 डायऱ्या पोलिसांच्या हाती, मिळाली ‘ही’ महत्त्वाची माहिती

अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा हे जग सोडून तेरा दिवसाचा कालावधी लोटला असला तरी अजून त्याबाबत चर्चा थांबताना दिसत नाही. अजूनही याबाबत वेगवेगळे खुलासे समोर येत असल्याचे सध्या तरी दिसत आहेत.

त्यामुळे या प्रकरणात अजून कोण कोण सहभागी झाले आहे, याबाबतचा खुलासा येत्या काळात लवकरच होणार आहे. एकीकडे सुशांत याच्या जाण्याने त्याचे कुटुंबीय हतबल झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी सुशांत सिंह राजपूत याच्या घराचे स्मारक करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी एक फाउंडेशन स्थापन करण्याचा निर्णय देखील त्यांनी घेतला. सुशांत अमर्याद स्वप्न पहायचा आणि ती स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी सिंहासारखा पाठपुरावा करायचा, अशा शब्दात सुशांत सिंह राजपूत याच्या कुटुंबीयांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. सुशांत सिंह राजपूत फाउंडेशनची स्थापना करण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.

याच्या माध्यमातून चित्रपट, विज्ञान क्षेत्रातील तरुण प्रतिभावंतांना मदत केली जाईल. पाटणा शहरातील राजीवनगर येथील त्याच्या बालपणीचे घराच्या स्मारकात रुपांतर करण्यात येईल. तेथे त्याच्या वैयक्तिक वस्तू जतन करून ठेवले जातील. त्यात हजारो पुस्तके व त्याची आवडती दुर्बिण ठेवण्यात येणार आहेत.

या वेळी त्याच्या कुटुंबीयांनी चाहत्यांचे आभार देखील मानलेले आहेत. सुशांत गेल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियातून आगपाखड केली होती. त्यामुळे कुटुंबियांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. या प्रकरणात प्रथम त्याची माजी प्रेयसी अंकिता लोखंडे हीची चौकशी झाली तर त्यानंतर रिया चक्रवर्ती चे देखील चौकशी करण्यात आली होती. सुशांत याने काही कंपन्या देखील स्थापन केल्याचे समोर येत आहे.

या कंपन्यांमध्ये रिया चक्रवर्ती आणि शोबित चक्रवर्ती यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. सुशांत गेल्यानंतर अनेक अभिनेत्यांनी यावर नाराजी व्यक्त करून काही जणांची चौकशी करण्यात यावी, असे सांगितले होते. यामध्ये सुरुवातीला अभिनेता सलमान खान याच्या नावाचा समावेश होता. सलमान खानमुळे सुशांत सिंह राजपूत हा जग सोडून गेला.

हा सलमान खान वर आरोप होता. सलमान खान याला ड्राईव्ह या चित्रपटात त्याच्या आवडीच्या कलाकाराला घ्यायचे होते. मात्र, करण जोहर ने त्याच्या आवडीचा कलाकार अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची निवड या चित्रपटासाठी केली. त्यामुळे सलमान खान याने कट करून हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित न होऊ देता नेटफिक्सलवर प्रदर्शित केला, असा आरोप केला होता.

त्यानंतर या प्रकरणात महेश भट याचे नाव जोडण्यात आले. महेश भट आणि रिया चक्रवर्ती यांच्यात काहीतरी शिजत असल्याचे देखील सांगण्यात येत होते. या दोघांनी काहीतरी करून सुशांत याला असे करण्यास प्रवृत्त केल्याचे देखील बोलले जात होते. त्यानंतर पोलिसांनी त्या दृष्टीने देखील चौकशी केल्याचे समोर आले आहे.

तसेच शेखर सुमन यांनीदेखील या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी असे म्हटले आहे. सुशांत याची मॅनेजर यांनी दिलेल्या माहितीनंतर आता संजना सांगवी हीची देखील चौकशी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. संजनाने सुशांत सोबत शेवटच्या चित्रपटात काम केले होते.

दिल बिचारा नावाचा हा चित्रपट ओटीपी 24 तारखेला प्रदर्शित होत आहे. सुशांत शेवटच्या काळात अतिशय विक्षिप्त वागत असल्याचे तिचे म्हणणे आहे. आपल्याला नको त्या जागी त्याने स्पर्श केला होता, असेही ती म्हणाली आहे.

आता तिची देखील चौकशी होणार आहे. आता या प्रकरणात पोलिसांनी सखोल चौकशी करून सुशांतच्या घरातून चार डायर्‍या हस्तगत केल्या आहेत. या डायरीमध्ये सुशांतने काही महत्त्वाच्या बाबी लिहून ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात आता आणखी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *