“सुशांत करू शकतो मग मी का नाही?”; असं म्हणत दहावीच्या विद्यार्थ्याची संपवली आपली जीवनयात्रा

“सुशांत करू शकतो मग मी का नाही?”; असं म्हणत दहावीच्या विद्यार्थ्याची संपवली आपली जीवनयात्रा

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याने सर्वांनाचं मोठा धक्का बसला आहे. अशातच उत्तर प्रदेशातील बरेली येथील एका दहावीच्या विद्यार्थ्याने आपले जीवन संपवले आहे. धक्कादायक म्हणजे या विद्यार्थ्याने सुशांतच्या जाण्याची बातमी पहिल्यानंतर असं टोकाचं पाऊल उचललं.

‘जर अभिनेता सुशांत सिंह राजपूत असे करू शकतो, तर मी का नाही’, असं या विद्यार्थ्याने म्हटलं होतं. या घटनेमुळे उत्तर प्रदेशात एकच खळबळ माजली आहे.

दरम्यान, आपल्या मृत्यूसाठी विद्यार्थ्याने कोणालाही जबाबदार धरलेलं नाही. मृत विद्यार्थ्यांच्या लहान भावाने पोलिसांना सांगितलं कि, आम्ही दोघेही टीव्ही बघत असतांना सुशांतच्या आत्महत्येची बातमी आली होती. त्यावेळी मोठा भाऊ म्हणाला, सुशांत सारखं आपण दोघंही असं फासावर लटकायला हवं.

इतका मोठा अभिनेता आत्महत्या करू शकतो तर आपण का नाही. असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याने म्हटलं असल्याचं लहान भावाने वडिलांना सांगितलं. पोलिसांनी या घटनेबाबत चौकशी सुरू केली आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *