बॉलिवूड पुन्हा हादरलं ! सुशांत नंतर ‘या’ अभिनेत्याची राहत्या घरी गळफा*स लावून आ*त्म*ह*त्या

बॉलिवूड पुन्हा हादरलं !  सुशांत नंतर ‘या’ अभिनेत्याची राहत्या घरी गळफा*स लावून आ*त्म*ह*त्या

मनोरंजन क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जणू मृत्*यूचे सत्र सुरू आहे. 14 जून ला सुशांत सिंग राजपूत याने राहत्या घरी ग*ळ*फा*स लावून आपली जीवनयात्रा संपवली. अद्याप या प्रकरणाला योग्य तो न्याय मिळत नाही तोवर अनेक कलाकारांनी देखील आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यात एका साऊथच्या अभिनेत्याने देखील राहत्या घरी ग*ळ*फा*स लावून आपले जी*वन संपविले होते.

पण आता अशीच एक घटना समोर येत आहे. बॉलिवूड असो की टीव्हीची दुनिया, अभिनेता अभिनेत्रींच्या मृ*त्यूची बातमी समोर येत आहे. सुशांतसिंग राजपूतला निधनानंतर आज पुन्हा एक टीव्ही अभिनेत्याने जगाला निरोप दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार समीर शर्मा काही दिवस कोणालाही दिसला नव्हता. त्याचवेळी जेव्हा त्याच्या फ्लॅटमधून सोसायटीला वास येऊ लागला तेव्हा सोसायटीच्या पहारेकऱ्याने पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर भेट देऊन घर उघडले असता त्यांना अभिनेता समीर शर्माचा मृ*तदे*ह लटकलेला आढळला.

असे सांगितले जात आहे की सुमारे दोन दिवसांपूर्वी समीर शर्माचा मृ*त्यू झाला होता आणि जेव्हा शरी*राचां वास आजूबाजूला येऊ लागला होता, तेव्हा परिसरतील लोकांना संशय आला व त्यानंतर पोलिसांना बोलविण्यात आले.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालाडमधील भाड्याने दिलेल्या फ्लॅटमध्ये 44 वर्षीय समीरने आपल्या स्वयंपाकघरातील एका पंख्याला कापडाचे सहायाने लटक*उन घेतले होते. समीर मालाड पश्चिमेला अहिंसा मार्गावरील नेहा सीएचएस नावाच्या इमारतीत राहत होता. त्याआधी समीरला आजाराची मोठी समस्या होती आणि समीर दीर्घकाळ उपचार घेत होता.

नंतर, तो बरा देखील झाला आणि त्याने पुन्हा अभिनय करण्यास सुरवात केली होती. सध्या तो स्टार प्लस शो ये रिश्ता क्या कहलाता है मधील एक कलाकार होता. शोमध्ये तो कुहूच्या वडिलांच्या रूपात दिसला. बुधवारी रात्री समीरचा मृ*तदे*ह त्याच्या फ्लॅटमध्ये सापडला.

मालाड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक जॉर्ज फर्नांडिस यांनी सांगितले की, अजुन तरी समीरने कोणतीही सु*साइ*ड नोट लिहिलेली सापडली नाही आणि दोन दिवसांपूर्वीच त्याने आ*त्म*ह*त्या केली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इमारतीच्या चौकीदाराने किचनच्या खिडकीतून त्याचा मृ*तदे*ह पाहिला तेव्हा त्याचा मृ*त्यू झाल्याचे उघडकीस आले. यानंतर त्यांनी सोसायटीच्या इतर सदस्यांना देखील सांगितले.

याबाबत लगेचच लोकांनी पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना समीरच्या घटनेबाबत माहिती दिली. यानंतर समीरला रुग्णालयात नेण्यात आले जेथे त्याला मृ*त घोषित करण्यात आले. पोलिस अधिकारी म्हणाले की, समीर फेब्रुवारीपासून त्याच्या फ्लॅटमध्ये एकट्यानेच राहत होता. तो त्याच्या कुटुंबातील सदस्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

कोणतीही सु*साइ*ड नो*ट सापडली नाही

फर्नांडीझ म्हणाले, “आमच्याकडे त्याच्याकडून कोणतीही सु*साइ*ड नोट मिळालेली नाही. असे दिसते आहे की ही आ*त्म*ह*त्येची घटना असू शकते. दोन दिवसांपूर्वी त्याने स्वत: ला फा*शी देऊन आ*त्म*ह*त्या केल्याचा अंदाज आहे. त्यानंतर पोलिसांनी मृ*तदे*ह पो*स्ट*मार्ट*मसाठी पाठविला. ”

प्राथमिक माहितीनुसार, अपघाती मृ*त्यू अहवाल (एडीआर) दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात पोलिस आर्थिक दृष्टीकोनातून देखील तपास करत आहेत. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृ*त्यू*च्या प्रकरणीही मुंबई पोलिस सध्या तपास करत आहेत. सुशांत वांद्रे येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृ*त अवस्थेत आढळला होता.

समीर शर्मा हा दिल्लीचा रहिवासी होता आणि त्याने बंगळुरू येथून शिक्षण घेतले. अभ्यास संपल्यानंतर त्यांनी एका जाहिरात कंपनीतही काम केले. 2003 साली ते मुंबईत आला आणि आपल्या अभिनय कारकिर्दीवर भर दिला.

2004 मध्ये स्टार वन च्या टेलीव्हिजनवरील मालिका ‘दिल क्या चाहता है’ मधे त्याला काम करण्याची पहिली संधी मिळाली. या मालिकेतील त्याचे काम लोकांना इतके आवडले की त्याला एकता कपूरच्या सर्वात प्रसिद्ध मालिका ‘कहानी घर-घर की’ मध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्याने परत मागे वळून पाहिले नाही.

समीर शर्माचा मित्र आणि अभिनेता मनीष वधानाने बीबीसी हिंदीला सांगितले की ही बातमी ऐकून त्यांना धक्का बसला आहे. वाधवा म्हणतात की, “मी समीरबरोबर स्टार प्लस सीरियल ‘इस प्यार को क्या नाम दू’ मध्ये काम केले होते. तो खूप जिंदादील माणूस होता. सेटवर आम्ही खूप मजा करायचो. तो खूप हुशार आणि बौद्धिक होता. शो संपल्यानंतरही आम्ही एकमेकांच्या बरोबर रहात होतो. ”

तो म्हणाला, “बर्‍याच वेळा आम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर बोलायचो पण लॉकडाऊन दरम्यान मी त्याच्याशी कधीच बोलू शकलो नाही. लॉकडाउन होण्यापूर्वी आम्ही एकमेकांना भेटत देखील होतो, पण त्यानंतर लॉकडाउन झाले आणि त्यांचा मेसेज येणे बंद झाले. आणि आता अचानक अशी बातमी ऐकून विश्वासच बसत नाही.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *