सुशांतच्या मृ त्यू बाबत शेवटच्या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री ‘संजना सिंघवी’ ने केला खुलासा, म्हणाली सुशांतवर…

सुशांतच्या मृ त्यू बाबत शेवटच्या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री ‘संजना सिंघवी’ ने केला खुलासा, म्हणाली सुशांतवर…

अभिनेता सुशांत सिंह राजपूत अचानक आपल्याला सोडून जायला जवळपास वीस दिवसांचा कालावधी लोटला आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आजवर या प्रकरणात 27 जणांची चौकशी केली असून त्यातून बरेच काही निष्पन्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात सलमान खानपासून शेखर कपूर यांची नावे जोडली गेली आहेत.

तसेच काही मोठ्या प्रोडक्शन हाऊस यांची देखील या प्रकरणात नावे जोडली गेली आहेत. वायआरएफ यांचे देखील या प्रकरणात नाव समोर आले आहे. वायआरएफने त्याला अतिशय कमी मोबदला दिल्याचे देखील सांगण्यात येत आहे. रिया चक्रवर्तीची सुरुवातीला पोलिसांनी तब्बल बारा तास चौकशी केली होती. यामध्ये अनेक खुलासे झाले असण्याची शक्यता आहे.

घटनेच्या दिवशी त्याने औषधदेखील घेतल्या नव्हत्या होत्या, असे समोर आले आहे. या प्रकरणी अनेकांचे जबाब नोंदवलेले आहेत. यशराज फिल्म सोबत त्याचा काहीतरी वाद झाला होता, असे देखील समोर आले आहे. सलमान खानच्या वादानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याला चांगलेच झोडून काढले केले होते.

आता याबाबत सुशांत सिंह सोबत ‘दिल बेचारा’ या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री संजना सिंघवी हिचा लेखी जबाब नोंदवला आहे. यापूर्वी संजना हिने सुशांत बाबत मिटू मोहिमेअंतर्गत अनेक आरोप केल्याचे समोर आले होते. सुशांत सिंह राजपूत याने त्याचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा हा केला होता. या चित्रपटात संजना हिने भूमिका केली होती.

या चित्रपटाचा सेटदरम्यानच सुशांत अतिशय विक्षिप्त वागत असल्याचे यापूर्वी संजना हिने सांगितले होते. मात्र हे सर्व ऑफ रेकॉर्ड असल्याने याबाबत काहीही खुलासा होत नव्हता. नुकतीच संजना हीची चौकशी केली. त्यावेळी अनेक बाबींचा खुलासा झाला आहे. या वेळी संजना हिने मिटू मोहिमेअंतर्गत देखील अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहे.

संजना हिने सांगितले की, दिल बेचारा या चित्रपटासाठी माझी निवड करण्यात आली होती. त्यावेळी मला या चित्रपटात माझ्या सोबत अभिनेता कोण आहे याबाबत माहिती नव्हती. मात्र, मला एक दिवस सुशांत सिंह राजपूत आपल्या अपोजिट असल्याचे समजले. त्यानंतर सुरुवातीला माझी त्याची सेटवर ओळख झाली.

तो अतिशय शांत स्वभावाचा माणूस होता. मी जेव्हा माझ्या आईसोबत अमेरिकेला फिरायला गेले होते, त्यावेळी वृत्तपत्र आणि माध्यमातून अनेक अशा बातम्या आल्या होत्या की, मी टू मोहीम सध्या जोरात सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत सुशांत सिंह राजपूत याच्यावर देखील आरोप करण्यात आले होते.

सुशांत सिंह राजपूत याने मिटू अंतर्गत मलादेखील त्रास होत असल्याचे सांगितले होते. मात्र, हे सर्व खोटे असल्याचे संजना हिने सांगितले. याबाबत माध्यमांना कशी माहिती मिळाली मला अजिबात माहिती नाही. मात्र, मी असे कधीही सांगितले नव्हते. सुशांत सिंह बाबत असे वक्तव्य मी कधी केलं नाही. तो अतिशय चांगला माणूस होता.

मिटू अंतर्गत सुशांत सिंह राजपूत त्याचे नाव जोडले गेल्याने तो खूप अस्वस्थ होता, असे देखील संजना हिने सांगितले आहे. सुशांत सिंह याने मला याबाबत अनेकदा सांगितले देखील होते. तसेच त्याने आपल्याला अनेक स्क्रीन शॉट देखील पाठवले होते, असे देखील तिने सांगितले आहे. सेटवर त्याने माझी कधीही छेड काढली नव्हती.

मात्र, मी टू मोहिमेचा मला खूप त्रास झाला होता. याबाबत त्याने मला बोलून देखील दाखवले होते. त्यामुळेच तो डि*प्रे*श*मध्ये आल्याचे देखील संजना हिने सांगितले. त्यामुळे आता या प्रकरणाची वेगळ्या प्रकारे चौकशी करणार आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.