आ त्म ह त्येपूर्वी सुशांतने गुगलवर ‘ही’ माहिती केली होती सर्च, मोबाईलच्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये माहित उघड

अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा जग सोडून जवळपास पंधरा दिवसाचा कालावधी लोटला असला तरी अजूनही त्याबाबत चर्चा थांबताना दिसत नाही. आजवर पोलीसांनी या प्रकरणात तब्बल 26 जणांचा जबाब नोंदवला आहे. तरीदेखील पोलिसांचा तपास अंतिम टप्प्याला गेलेला नाही. या प्रकरणात अनेक जणांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
तसेच सुशांत याच्या चाहत्यांनी देखील सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केली. मात्र, पोलिस आपल्या परीने सध्या तपास करताहेत. सुरुवातीला या प्रकरणात पोलिसांनी त्याची माजी प्रेयसी अंकिता लोखंडेची चौकशी केली. मात्र, तिच्या चौकशीतून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यानंतर पोलिसांनी सुशांतची बिझनेस पार्टनर असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची बारा तास चौकशी केली.
या प्रकरणात सलमान खान याच्यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. तसेच घराणे शाहीचा वास या प्रकरणामागे आला होता. त्या दृष्टिकोनातूनही पोलिसांनी सखोल चौकशी केली. मात्र, त्यातून काहीही निष्पन्न झाले नसल्याचे समोर येत आहे. दरम्यान, विकिपीडिया वर सुशांत जग सोडून जाण्याचे स्टेटस सकाळी नऊ वाजताच अपडेट आले होते.
मात्र, तो गेला अशी बातमी दुपारी एक वाजता सगळीकडे आली होती. त्यामुळे त्याच्या जग सोडून जाण्याला कोण कारणीभूत आहे, याचा शोध घेण्याची मागणी चाहते करत आहेत. विकिपीडियावर आधीच माहिती कशी काय अपडेट झाली, याबाबत देखील पोलिस चौकशी करत आहेत. त्याच्या चाहत्यांनी याबाबत हे प्रकरण लावून धरले आहे.
दरम्यान, जग सोडून जाण्याआधी सुशांत सिंह राजपूत याने १४ जूनला सकाळी १०.१५ मिनिटाच्या दरम्यान गुगलवर स्वतःचे नाव,स्वतःचे लेख आणि काही फोटो पाहिल्याचे समजते. पोलिसांनी याबाबत खुलासा केला असून सुशांत याने गुगलवर काहीतरी सर्च केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अधिक खोलात गेले असता त्याने स्वतःचे लेख वाचल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिस आता त्यादृष्टीने तपास करताहेत. या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.