बॉलिवूडला मागे टाकत स्वप्नील जोशीने ‘या’ अभिनेत्रीसोबत दिला पुन्हा लिपलाॅक सीन, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये फार पूर्वीपासून इंटीमेट सीन देण्याची परंपरा आहे. मात्र, पूर्वीच्या काळात असे सीन एवढ्या मोठ्या प्रमाणात देण्यात येत नव्हते. तरीदेखील एखाद्या अभिनेत्रीने असा सीन दिला तर मोठी खळबळ उडायची.
आता मात्र बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात लीपलॉक सीन देण्याचे प्रकार वाढत आहेत. हाच ट्रेंड आता मराठी चित्रपटसृष्टीत देखील मोठ्या प्रमाणात असल्याचे पाहायला मिळत आहे. काही वर्षापूर्वी अभिनेत्री मल्लिका शेरावत तिचा मर्डर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील गाण्यांनी धमाल उडवून दिली होती.
त्यानंतर करिश्मा आणि आमीर यांनी कधीही पुन्हा एकत्र काम केले नाही. आता हा ट्रेंड मराठीत देखील रुजत आहे. काही वर्षांपूर्वी जोगवा चित्रपटात मुक्ता बर्वे आणि उपेंद्र लिमये यांनी धमाल उडवून दिली. त्या चित्रपटात दोघांनी लीपलॉक सिन देऊन सर्वांना चकित केले होते. हा चित्रपट राष्ट्रीय स्तरावर प्रचंड गाजला होता. त्यानंतर मराठी चित्रपटात बोल्ड सीन्सचा प्रघात पडायला सुरुवात झाली होती.
अभिनेता स्वप्नील जोशी याने देखील असे काही सीन केलेले आहेत. उत्तर रामायण मालिकेपासून आपल्या करियरची सुरूवात त्याने केली होती. त्यानंतर त्याने कृष्णही मालिकादेखील केली. आज तो मराठी मधला आघाडीचा स्टार आहे. गेल्या काही वर्षापासून तो प्रचंड चर्चेत आहे. दुनियादारी हा चित्रपट काही वर्षापूर्वी आला होता. या चित्रपटात देखील त्याने सई ताम्हणकर सोबत असा सीन देऊन धमाल उडवून दिली होती. हा चित्रपट तरुणांना प्रचंड आवडला होता.
आता या अभिनेत्रीसोबत दिला लीप लॉक सिन
काही वर्षांपूर्वी आलेल्या दुनियादारी या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी याने सई ताम्हणकर हिच्यासोबत लीपलॉक असे म्हणता येणार नाही, पण असाच काहीसा सीन दिला होता. त्यानंतर आलेल्या मितवा या चित्रपटात त्याचा आणि सोनाली कुलकर्णी चुंबन सीन प्रचंड गाजला होता. अनेकांनी यावर टीका देखील केली होती.
मात्र, याला जवळपास लाखाच्यावर व्ह्यु मिळाले होते. आता स्वप्निल जोशी अनेक प्रोजेक्टमध्ये काम करत आहे. मात्र, गेल्या महिन्यात मॅक्स प्लेयरवर त्याची वेबसिरीज प्रकाशित झाली आहे. याचे नाव समांतर असे आहे. सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीवर आधारित ही सीरिज आहे.
यात स्वप्नील जोशीच्या बायकोची भूमिका तेजस्विनी पंडित हिने केली आहे. यात दोघांनी किसिंग सीन देऊन सर्वांना चकित केले आहे. ही व सीरिज सध्या मॅक्स प्लेअर धुमाकूळ घालत असून याची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. तसेच तेजस्विनी आणि स्वप्निलच्या या सीनची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.