‘सैराट’ सिनेमातील ‘लंगडा’ प्रदीप म्हणजेच तानाजी गलगुंडे सध्या काय करतो..!

सैराट हा सिनेमा मराठी चित्रपट श्रुष्टीतील सर्वात हिट सुपरहिट सिनेमा आहे. कारण म्हणजे त्यातील प्रत्येक पात्राने आपले काम चोखपणे बजावले होते. या सिनेमातील प्रत्येक कलाकारांचे सिनेमाशी कुठलेच बॅकग्राऊंड नसताना प्रत्येकाने आपला अभिनय चोखपणे फार पडला.
याच चित्रपटातून मराठी इंडस्ट्रीला आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू आणि परशा म्हणजेच आकाश ठोसर हे दोन कलाकार भेटले. पण सैराट सिनेमात प्रत्येकाने आपला उत्तुंग अभिनय प्रेक्षकांनसमोर सादर केला. त्यातील एक अभिनेता म्हणजे आपला सर्वांचा आवडता लंगड्या उर्फ तानाजी गलगुंडे.
पण खर तर तो खऱ्या आयुष्यात ही अपंगच आहे. त्याला लहानपणापासून शेती करण्याची मनापासून आवड आहे. जरी तो एक अभिनेता झाला असला तरी आपल्यातील शेतीला विसरला नाही.
तानाजीचे चाहते त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी ही येतात आणि त्याच्यासोबत फोटो ही काढतात. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बेंबले या गावी तानाजी राहत आहे. सध्या तरी तो आपले शिक्षण पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे.
कॉलेज मध्ये बी ए च्या दुसऱ्या वर्षाला तो शिकत आहे. शेतीची आवड आहे पण पाण्याच्या कमतरतेमुळे शेती तशीच पडून आहे. त्याच्या उदरनिर्वाह साठी पंचायत समितीने त्याला झेरॉक्स मशीन ही दिले आहे.
सैराट नंतर तानाजीने काय केले ह्याची उस्तुक्ता सगळ्यांनाच असेल. त्याने सोनी चॅनेलवर ड्रामा कंपनी ह्या कॉमेडी शो मध्ये काम केलं. त्यांनतर मात्र तो कोणत्याच चित्रपटात किंवा मालिकेत दिसला नाही.
Very srugle in his life .i.e a real life hero in his family so god bless you