बॉलिवूड मध्येही आपला दबदबा निर्माण करणाऱ्या ‘4 मराठी’ खलनायिका, 3 नंबरशिवाय तर मराठी चित्रपट पूर्ण होतच नव्हता

बॉलिवूड मध्येही आपला दबदबा निर्माण करणाऱ्या ‘4 मराठी’ खलनायिका, 3 नंबरशिवाय तर मराठी चित्रपट पूर्ण होतच नव्हता

आजवर आपण मराठी हिंदी आणि इतर भाषांच्या चित्रपटात तसेच हॉलीवूड चित्रपटात देखील पुरुष खलनायक असलेले पात्र अनेकदा पाहिले असेल. मात्र, काही वर्षांपूर्वी स्त्रियांनी चित्रपटात काम करणे हे अश्लाघ्य मानले जायचे.

त्यानंतर काही काळ बदलला आणि मराठी तसेच हिंदी चित्रपटात महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात काम करू लागल्या. मात्र, त्यावेळी खलनायकाचे पात्र हे केवळ पुरुषांच्या वाट्याला येत असे. असे पात्र करणे म्हणजे वाईटपणाचे मानले जायचे. कारण अशी भूमिका केल्यानंतर अनेक जण त्याला क्रूर व्यक्ती म्हणून बघायचे.

तसेच वैयक्तिक आयुष्यात देखील अनेकांना असा वाईट अनुभवचा सामना करावा लागला आहे. म्हणजे की चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारल्यानंतर अशा अभिनेत्यांना टीकेला सामोरे जावे लागले. आज आम्ही आपल्याला मराठी चित्रपटात महिला अभिनेत्री खलनायिका असणारे हिट पात्र बाबत माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

१. शशिकला: जुन्या काळातील या अभिनेत्रीने हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टी आपल्या ताकदीच्या अभिनयावर गाजवून सोडली होती. असे अनेक चित्रपट आहेत की ज्यामध्ये शशिकला यांनी अतिशय चांगले खलनायिकेचे पात्र करून प्रेक्षकांच्या मनात घर केले.

याचा अनुभव त्यांना प्रत्यक्षात सार्वजनिक जीवनात वावरताना देखील आला. हिंदीमध्ये खाष्ट सासू असलेली त्यांची भूमिका अतिशय गाजलेली होती.

२. सविता मालपेकर: अतिशय चतुरस्त्र असणारी ही अभिनेत्री गेल्या काही काळापासून मराठी आणि हिंदी चित्रपट गाजवत आहे. या अभिनेत्रीने अनेक चित्रपटात खलनायिकेचे पात्र साकारले आहे. त्यासाठी तिला अनेकदा पुरस्कार देखील मिळाले आहेत. मात्र, महेश मांजरेकर यांच्या काकस्पर्श या चित्रपटातील तिची भूमिका प्रचंड गाजली होती.

३. उषा नाडकर्णी: माहेरची साडी या चित्रपटातून उषा नाडकर्णी यांनी प्रथमच खलनायिका पात्र असलेली सासूची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. या चित्रपटानंतर उषा नाडकर्णी यांना अनेक चित्रपटातून खलनायिका असलेले पात्र मिळू लागले. सासू कशी खाष्ट असावी, हे उषा नाडकर्णी यांनी आपल्या भूमिकेतून दाखवून दिले.

४. ललिता पवार: जुन्या काळातील ही दिग्गज अभिनेत्री खऱ्या अर्थाने बॉलिवुड आणि मराठी चित्रपटांत खलनायिका असलेले पात्र काय असते, हे ललिता पवार यांनी दाखवून दिले.

आजवर अनेक चित्रपटांमध्ये ललिता पवार यांनी खलनायिकांचे पात्र अतिशय चांगल्या पद्धतीने साकारले याचा देखील त्यांना वैयक्तिक आयुष्यात मोठा वाईट अनुभव आला होता. मात्र, त्यांनी एकदा सांगितले होते की, लोक मला वाईट बोलतात यातच माझे यश आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *