दररोज सकाळी तुळशीची ‘2 पाने’ खाल्याने ‘हे 5 रोग’ कायमचे संपतील..

दररोज सकाळी तुळशीची ‘2 पाने’ खाल्याने ‘हे 5 रोग’ कायमचे संपतील..

तुळस हे भारतातील एक पवित्र आणि औषधी गुणांनी भरलेले एक बहुपयोगी रोपटे आहे. भारतात हिन्दी धर्मीयांच्या प्रत्येक घरासमोर तूम्हास तूळस नक्कीच दिसेल. तुळस वृंदावनास माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे तूळस भारतीयांच्या मनाशी जूळलेले रोपटे आहे. त्यामूळे यास सर्वत्र एक खास महत्व असते.

आयुर्वेदात तुळशीचे खूप महत्व आहे. तुळशीला असंख्य आजारांमध्ये फायदेशीर मानले जाते, तुळशीमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत. या वनस्पतीमध्ये कीटक आणि डास दूर ठेवण्याचे गुण आहेत. तुळशीचे दोन प्रकार आहेत,एक काळी तुळस व दुसरी हिरवी तुळस. आयुर्वेदामध्ये काळ्या तुळशीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे.

औषधी गुणधर्माच्या बाबतीत काळी तुळस अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून रोज सकाळी तुळशीची काही पाने रिकाम्या पोटी खाणे आरोग्यास अद्भुत फायदे देतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत.

तुळशीची पाने पचन योग्य ठेवण्यास मदत करते, पचनामध्ये काळ्या तुळशीच्या रसाचा पाचक म्हणून उपयोग होतो. त्याबरोबर पोटाची अस्वस्थता आणि जळजळ होण्यापासून प्रतिबंधित करते, तुळशी शरीराची पीएच पातळी राखण्यास देखील मदत करते.

सर्दी खोकला ताप दांतदुखी श्वासारोध, श्वासात दुर्गंधी, दमा, फुफ्फुसांचे रोग, ह्नदयाचे विकार, हया सर्वांमध्ये तुळस वापरली जाते. तुळशीची ताजी पाने खाल्ल्यास सर्दी खोकला बरा होतो. दातांमध्ये तुळसतेल भरल्यास दातांच्या वेदना कमी होतात. ताजी पाने खाल्ल्यास तोंडातील दुर्गंधी कमी होते.

मज्जासंस्था आरामशीर करते, रक्त प्रवाह सुधारते, तुळशीची पाने देखील डोकेदुखीपासून मुक्त होतात, तणाव आणि डोकेदुखीच्या समस्येचा सामना करण्यासाठी दररोज सकाळी 2-3 तुळशी पाने रिकाम्या पोटी घ्या. सकाळी तुळशीची 2 ते 3 पाने रिकाम्या पोटी खाल्ल्यास थोड्या दिवसात सर्दी व खोकल्यापासून आराम मिळेल

लहान मुलाच्या खोकल्यावर, किवा टॉनिक म्हणून पानाच्या रसाचा उपयोग करतात. नायटा झाल्यावर तुळशीच्या पाण्याचा रस करून त्या जागी लावतात. कानाच्या दुखण्यावर उपाय म्हणुन तुळशीच्या पानाचा रस उपयुक्त ठरतो .तुळस उष्णतेच्या त्रासापासून आराम देते.

लहान बाळांना तापा असल्यास तुळसतेलाने आंघोळी आधी बाळाच्या अंगाची तेल मालीश केल्यास ताप कमी होतो. तुळशीत प्रतिजैविके आणि वेदनानाशके असतात त्यामूळे तापावर तूळसपाने खाल्ल्यानेही आराम मिळतो

तुळशीचे बी पाण्यात २ ते ६ तास भिजवून. भिजलेल्या बिया दुध-साखरेबरोबर खाल्ल्यास उष्णता कमी होते. मधमाशीचा दंश झाल्यास तुळसीतली माती वापरल्यास आराम पडतो. कीडा, मुंगी अगर डास चावल्यास तुळशीची ४-५ पाने धुवून तळहातावर तंबाखूसारखी चोळतात व निघालेला रस दंशाचे जागी लावावा. त्याने आग होणे थांबते. तुळस मोठया प्रमाणात प्राणवायू सोडते .त्यामुळे सकाळी व संध्याकाळी तुळशीला प्रदक्षिणा घालण्याने आरोग्य उत्तम राहते.

तुळस आपल्याला विविध संक्रमणापासून वाचवते. तुळस पानांचे २, ३ थेंब पाण्यात टाकल्यास पाणी निर्जंतुक होते. लहान बाळांच्या अंघोळीसाठी तुळशीच्या पानांना पाण्यात टाकून त्याने अंघोळ केल्यास आरोग्यदायी मानले जाते. तुळस पाने सुगंधीत असतात. याच्या पानांचा सुगंध घेतल्यास श्वसनतंत्रातील जिवाणूंचे संक्रमण कमी होते.

प्रत्येक घरासमोर एक तुळस असल्यास घरातील हवा शुध्द होते. तुळस पानांना कूटून त्यांना मधासोबत घेतल्यास गळयातील कफ दूर होतो. भारतात पारंपारीक पध्दतीने विविध जैविक संक्रमणात विविध औषंधीसोबत तुळसपानांचा वापर केला जातो.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.