जर उसाचा रस प्यायला आवडत असेल, मग पिण्याअगोदर या गोष्टी तुम्ही तुम्ही वाचल्याचं पाहिजे नाहीतर….

उसाचा रस प्यायला सगळ्यांनाच आवडतो. प्रत्येक जण उन्हाळ्याच्या सिजन मध्ये उसाच्या रसाचा आनंद घेत असतो. अत्यंत मधुर असा उसाचा रस कोणाला नाही आवडणार. आपण जास्त करून मार्च ते मे या महिन्यात उसाचा रस जास्त पित असतो कारण त्यावेळी आपल्याला पाणी जन्य पेयांची जास्त गरज असते.
पण काही लोक अशीही असतात जे सर्व सिजन मध्ये हा रस पितात. आपण बाहेर मिळणारे कोल्ड्रिंक्स पित असतो पण त्यात असणारे केमिकल हे आपल्या शरीरातील खूप घातक असतात त्यामुळे नैसर्गिक प्रकारे बनवलेले सरबत कधीही चांगलेच असते ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे.
तसेच उसाचा रस मशीन मधून काढल्यावर लगेच प्या जास्त वेळ ठेऊ नये किंवा या रसामध्ये इतर कोणतेही पेय मिसळू नका. दिवसातून जास्तीत जास्त दोन ग्लास रस पिणे हे उत्तम आहे. आपल्या शरीराला प्रमाणापेक्षा कोणती गोष्ट वाईटच असते. म्हणून कोणत्याही आहाराचे अति सेवन करू नये.