सुशांतची बातमी एकूण ‘हादरल्या’ उषा नाडकर्णी ! म्हणाल्या सुशांत मला नेहमी म्हणायचा की….!

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गेल्या रविवारी बांद्रे येथील राहत्या घरी आपली जीवनयात्रा संपवली.सुशांतच्या अचानक जाण्याने सर्वांना आश्चर्य चकित केले आहे. काही लोकांचा यावर अजूनही विश्वास बसने कठीण आहे. पण सध्या सोशल मीडियावर फक्त सुशांतरुपी वादळ दिसत आहे.
नोव्हेंबरमध्ये सुशांत लग्न करणार होता, ज्या मुलीशी त्याचे लग्न ठरले होते, तिच्यासोबत तो तणावात होता, असेही सांगण्यात येत आहे. एका ३४ वर्षांच्या अभिनेत्याने असे अर्धवट जग सोडून जाणे अनेकांना रुचलेल नाही. खुप खडतर परिस्थितीवर मात करत आज इथवर पोहोचला होता. सुशांत याचा जन्म 21 जानेवारी 1986 रोजी झाला होता. त्याला चार बहिणी आणि एक भाऊ आहे.
त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. अनेक चित्रपटात त्याने भूमिका केल्या. मात्र, महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावरील चित्रपटाने त्याला चांगलीच ओळख दिली होती.
पवित्र रिश्ता मध्ये त्याने चांगले काम केले होते. या मालिकेत त्याच्या आईची भूमिका साकारणाऱ्या उषा नाडकर्णी यांनी सुशांत याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्या म्हणाल्या की, सुशांत सिंह राजपूत टोकाचे पाऊल उचलू शकेल, असे मला कधीही वाटले नाही.
तो खूपच मृदुभाषी होता, अगदी लाजाळू होता, आमच्या ग्रुपमध्ये तो सर्वात लहान होता. पवित्र रिश्ता जेव्हा सुरू झाली तेव्हा तो बावीस तेवीस वर्षांचा असावा. त्यावेळी ही मालिका पाहून आपल्याला मानव सारखा मुलगा असावा असे वाटायचे.
मात्र, सुशांत सिंह राजपूत असे काही करेल याची देखील कल्पना नव्हती. त्याची बातमी कानावर पडताच आपला हात थरथरून आले. मला सुरुवातीला माझ्या हेअर ड्रेसरने ही बातमी दिली. मात्र, तो असे काही करेल यावर विश्वास बसत नव्हता.
मला तो आई म्हणायचा : उषा नाडकर्णी
पवित्र रिश्ता या मालिकेचे चित्रीकरण सुरू झाले, तेव्हा सुशांत केवळ वीस-बावीस वर्षांचा होता. ही मालिका दहा-पंधरा वर्षापूर्वी छोट्या पडद्यावर आली होती. त्यावेळी या मालिकेने अनेक विक्रम मोडीत काढले होते. ही मालिका अनेक घराघरात पाहायली जायची.
सुशांतच्या आठवणी सांगताना उषा नाडकर्णी यांना गहिवरुन आले. त्या म्हणाल्या की, सुशांत सिंह मला आई म्हणायचा. मला सर्वजण तसे आऊ म्हणतात. मात्र, सुशांत मला नेहमी आई म्हणायचा. तसेच माझ्यासाठी घरून काहीतरी बनवून घेऊन या, असेही तो माझ्यामागे नेहमी हट्ट धरायचा. अशा आठवणी उषा नाडकर्णी यांनी सांगितल्या.