Video : पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारी ती अज्ञात यक्ती कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Video : पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारी ती अज्ञात यक्ती कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

विधान परिषद मधील,भाजपचे आमदार आणि धनगर समाजाचे मोठे नेते गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापूर येथे दगडफेक करण्यात आली आहे. सध्या ते ओबीसी आरक्षण जनजागृती दौरा करत आहेत. आणि त्यासाठी ते सोलापूर येथे दाखल झाले होते. याच दौऱ्याच्यावेळी घोंगडी बैठकीसाठी गोपीचंद आलेले असताना त्यांच्या ताफ्यावर थेट द’गडफे’क झाल्याची घ’टना घ’डली आहे.

सोलापूरमधील ‘श्री शैल्य हक्क महादेव मंदिर’परिसरात ही द’गडफे’क झाली आहे. यामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या गाडीचा एक फुटला असून गाडीतील इतर कोणाला देखील दगड लागला नाही. यामध्ये गोपीचंद यांना देखील कोणतीही दु’खापत नाही झाली, म्हणून एक मोठी दु’र्घटना टळली आहे. ‘मात्र या घटनेनंतर गोपीचंद यांनी बोलताना इशारा केला आहे.

घोंगडी बैठक उरकली आणि या बैठकीला तब्ब्ल चारशे-पाचशे लोक होते. हि बैठक संपल्यानंतर मी गाडीत बसलो. आम्ही गाडी सुरु करुन थोडं पुढे आलो आणि ही द’गडफे’क झाली. मी पाहिलं तेव्हा ४-५ लोक होते. मात्र, अंधारात अजून किती जास्त लोक असतील हे काय मला सांगता येणार नाही, मात्र नक्कीच त्यापेक्षा जास्तच लोक असतील.’ असं पडळकर यांनी सांगितलं.

या घ’टनेनंतर, गोपीचंद पडळकरांनी परत एकदा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे’ असं पडळकर कुत्सितपणे म्हणाले. ते सोलापुर येथे बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी संदर्भात राज्य सरकारला डाटा सादर करण्यास सांगून देखील राज्य सरकारने हे काम केले नाही.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं डीएनए बहुजन विरोधी आहे, म्हणूनच काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या मुलाने खुशाल विरोधी याचिका दाखल केली. केवळ काहीच जिल्ह्यासाठी मर्यादित असलेल्या नेत्यांना मी मोठे नेते मानत नाही आणि मानणार देखील नाही. मुळात, शरद पवार मोठे आहेत असं मी मानतच नाही, तुम्ही कोण मानत असाल ना तर तो तुमचा प्रश्न आहे. मी शरद पवार आणि अजित पवारांशी प्रत्येक मुद्दयावरुन भांडतो, आणि भांडत राहणार, असं देखील पडळकर म्हणाले.

मिटकरींनी दिली प्रतिक्रिया-गोपीचंद पडळकरांच्या या पातळीहीन टीकेला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जबरदस्त प्रत्युत्तर दिलं आहे. ‘भारतीय जनता पक्षातील अन्य कुठलीही व्यक्ती अशा पद्धतीने खालच्या पातळीवर प्रतिक्रिया देत नाही. पडळकर ही एक प्रवृत्ती आहे. भाजपमधील दोन-चार जणांचं मा’नसि’क सं’तुलन ढासळलं आहे त्यामधील पडळकर हे एक आहेत. त्यांची ही बेताल वक्तव्य येत आहेत त्यावर गां’भीर्याने लक्ष देणं योग्य वाटत नाही,’ अशा मोजक्याच शब्दात अमोल मिटकरी यांनी पडळकरांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *