विकी आणि कॅटरिनाच्या लग्नापेक्षा जास्त होतंय विकीच्या एक्स गर्लफ्रेंडची चर्चा, पहा कॅटरिनापेक्षाही दिसते सुंदर आणि हॉट…

विकी आणि कॅटरिनाच्या लग्नापेक्षा जास्त होतंय विकीच्या एक्स गर्लफ्रेंडची चर्चा, पहा कॅटरिनापेक्षाही दिसते सुंदर आणि हॉट…

Entertainment

सध्या बॉलीवूडमध्ये, लगीनघाई सुरु झाल्याचे बघायला मिळत आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट दोघांच्या लग्नाची चांगलीच तैयारी सुरु असल्याचं, सूत्र सांगत आहेत. सोबतच, कॅटरिना आणि विकी कौशल या दोघांच्या लग्नाची देखील तैयारी सुरु झाली आहे. कॅटरिना आणि विकी दोघांच्या लग्नाचे लोकेशन, डिझायनर असं जवळपास सगळ्याच गीष्टींचा हळूहळू उलगडा होत असल्याचं बघायला मिळत आहे.

सगळीकडेच कॅटरिना आणि विकिच्याच नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. पण आता अचानकच, विकी कौशलच्या एक्स गर्लफ्रेंडची चर्चा सुरु झाली आहे. विकी कौशलने, बॉलीवूडमध्ये पदार्पण केले तेव्हापासूनच तो चर्चेचा विषय होता. मसान सिनेमाने विकीला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. त्याच दरम्यान, त्याच्या लव्ह-लाईफची देखील चांगलीच चर्चा रंगली होती.

प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनय क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या हरलीन सेठी आणि विकी दोघांच्या नात्याची चांगलीच चर्चा रंगली होती. हरलीन सेठी, मॉडेलिंग क्षेत्रातील मोठं नाव होत. सोबतच तिने अभिनय क्षेत्रात देखील करियर बनवायची आपली धडपड सुरूच होती. एव्हडीटीव्हीच्या गुड-टाईम्स मधून तिने आपल्या करियरची सुरुवात केली. त्यानंतर, स्टार-प्लसच्या गुलमोहर ग्रँडस या मालिकेमधून तिला प्रसिद्धी मिळाली.

त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्यानंतर, ब्रोकन बट ब्युटीफुल या रोमँटिक सिरीजमध्ये तिने विक्रांत मेसी सोबत काम केले. विक्रांत मेसी आणि तिची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनात उतरली. उत्तम रोमँटिक सिरीजच्या यादीमध्ये, त्या सीरिजचे नाव अव्वल आहे. यामध्ये, हरलीनच्या लूकची आणि तिच्या अभिनयाची चांगलीच चर्चा रंगली होती.

कितने पाकिस्तान, द केज, लव्ह बाईट्स यासारख्या सिनेमामध्ये ती झळकली होती. हरलीन सेठी दिसायला खूपच सुंदर आणि तेवढीच फिट आहे. दरम्यान, ‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’ हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी त्या दोघांचे नाते चांगले होते. मात्र त्यानंतर, त्या दोघांच्या नात्याला तडा गेला. विकी आणि हरलीन दोघे हळूहळू दूर झाले आणि त्यांनी एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो देखील केले.

त्याबद्दल बोलताना हरलीन म्हणते की, ‘विकी आणि माझे नाते सुरुवातीला चांगले सुरु होते. आम्ही एकमेकांच्या प्रेमात वे’डे होतो. आम्ही आमच्या सुंदर भविष्याचे स्वप्न बघत होतो. यश मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. त्याला ते उरी सिनेमातून यश मिळाले देखील. पण त्यानंतर त्याचा मित्रपरिवार बदलला. माझ्यासोबत त्याचे वागणेसुद्धा बदलले.

त्याने मला इग्नोर करायला सुरुवात केली. अखेर मला माझा स्वाभिमान महत्वाचा होता. आणि म्हणून मी त्याच्यापासून दूर झाले. वेगळं होणं माझ्यासाठी जास्त योग्य निर्णय होता.’ विकी आणि कॅटरिनाच्या जोडीचे अनेकी चाहते आहेत. मात्र हरलीन आणि विकीच्या जोडीचा देखील मोठा चाहतावर्ग होता.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *