अनेकवेळा बोलावूनही Kapil Sharmaच्या ‘शो’मध्ये का गेला नाही Dhoni? समोर आलेलं कारण वाचून चकित व्हाल..

अनेकवेळा बोलावूनही Kapil Sharmaच्या ‘शो’मध्ये का गेला नाही Dhoni? समोर आलेलं कारण वाचून चकित व्हाल..

कॉमेडी नाईट विथ कपिल(comedy nights with kapil) द कपिल शर्मा शो अशा वेगवेगळ्या नावाने कपिल शर्मा(kapir sharma show) हा विनोदवीर गेल्या अनेक वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. कपिल शर्मा याच्या शोमध्ये अनेक जण सहभागी होण्यास उत्सुक असतात. मात्र, काही जण या शोमध्ये येण्यास उत्सुक नाहीत, असे ऐकल्यावर आपल्याला आश्चर्य वाटेल.

मात्र, हे खरं आहे काही सेलिब्रिटी असे आहेत की, त्यांनी कपिल शर्माच्या शो मध्ये येण्यास नकार दिला. या शोमध्ये आत्तापर्यंत बाबा रामदेव यांच्यापासून शाहरुख खान, सलमान खान यांच्यासह अनेक दिग्गज सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. कपिल शर्माचा शो म्हणजे एक विनोदाची पर्वणीच असते. तो आपल्या निखळ विनोदाने सर्वांना हसवतो.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्यासोबत अनेक व्हिडिओ बनवून त्याच्या बायोपिकची जाहिरात केली. त्याने या चित्रपटात त्याची भूमिका साकारली होती. पण तो प्रमोशन करण्यासाठी कोणत्याही रिअॅलिटी शोमध्ये दिसला नाही. धोनीला कपिल शर्मा शोमध्ये उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.

परंतु त्याने यात सहभागी होण्यास नकार दिला. महेंद्रसिंग धोनीचे वेळापत्रक व्यस्त होते आणि अनेक वेळा आमंत्रित करूनही तो शोचा भाग होऊ शकला नाही, असे सांगण्यात आले. सुपरस्टार आमिर खानलाही शोच्या निर्मात्यांनी आमंत्रित केले होते. पण त्याच्या चित्रपटांच्या प्रमोशनवर विश्वास नसल्यामुळे तो कोणत्याही शोचा भाग झाला नाही.

कॉमेडी शो नेहमीच चर्चेत असतात, मग ते कपिल आणि त्याच्या टीमच्या सेटवरील अनोख्या वागणुकीमुळे असो. गेल्या वर्षांच्या विश्रांतीनंतर द कपिल शर्मा शो पुन्हा ट्रॅकवर आला आहे आणि महामारीच्या काळातही प्रेम आणि सगळ्यांना हसवत असतो. मात्र, धोनी या शोमध्ये सहभागी झाला नाही. त्यामुळे सगळ्यांना आश्चर्य वाटले.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.