बॉलिवूड सिनेमे शुक्रवारीच ‘रिलज’ ‘का’ होतात? जाणून घ्या त्यामागील कारण

बॉलिवूडमधील एखादा सिनेमा जर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असेल तर तो साधारणपणे शुक्रवारी रिलीज केला जात असतो. असं का आहे असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे काय?. खरं तर ही पद्धत आजपासून नाही तर 1960 पासूनच चालत आली आहे.
असं म्हटलं जात आहे सिनेमा रिलीज करण्याची ही पद्धत बॉलिवूडनं हॉलिवूडकडून चोरली असावी. हॉलिवूडचा प्रसिद्ध सिनेमा 15 डिसेंबर 1939 रोजी फ्रायडेला रिलीज झाला असून, तेव्हापासून तिथे फ्रायडेला मुव्ही रिलीज केला जात असते.
यानंतर बॉलिवूडमध्ये शुक्रवारी सिनेमे रिलीज करण्याची प्रथा सुरु झाली.असंही म्हटलं जात की, मुंबईमध्ये अनेक कंपन्यांची फ्रायडेला अर्ध्या दिवसानंतर कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली जात असायची आणि सोबतच रविवारीही लोकांना सुट्टी पण असायची.
हेही कारण असल्याचं सांगितले जातं आहे, सिनेमे शुक्रवारी रिलीज केले जात असतात. शुक्रवार बॉलिवूडसाठी लकी आणि कमाऊ मानला जात असतो.