लवकर घाण होण्याची शक्यता असूनही, हॉटेल्समध्ये पांढरी ‘बेडशीट’च का वापरतात? जाणून घ्या त्यामागील कारण..

हॉटेलची खोली असो वा धर्मशाळा, तुम्ही पाहिले असेल की पलंगाची चादरी पांढरी शुभ्र असते. परंतु, तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? की हॉटेलमध्ये पांढरी चादरीच का वापरतात?, जरीही पांढरा कापड लवकर घाण होत असेल. जर तुम्हाला त्याबद्दल माहिती नसेल तर काळजी करू नका, कारण आज आम्ही तुम्हाला त्यामागचे कारण सांगणार आहोत.
जेव्हा आपण कुठे बाहेर जाण्याचा प्लॅन करतो तेव्हा आपण ठरवतो की, दोन रात्री हॉटेलमध्ये राहू वगैरे, तेव्हा सिंगल असणार्यांना नक्की आनंद होतो. कारण त्यांना असे वाटते की, चादर आपल्याला धुवावे लागणार नाही. आपल्याला पाहिजे तसे घाणेरडे करू शकतो. शूज घालूनच आपण या बेड वर झोपू शकतो. पण तुमची याचा विचार कधीच केला नसणार की, तिथे पांढरे चादरीच का वापरतात.?
पांढरी चादर स्वच्छता दर्शवते.
ग्राहक प्रत्येक हॉटेलमध्ये कस्टमर सर्वात जास्त साफसफाईची मागणी करतात. त्याचा असा विश्वास असतो की तो पाहिजे तेवढी घाण त्या खोलीत करू शकतो. प्रत्येक खोलीत पांढरे चादर वापरण्याचे कारण म्हणजे खोलीची स्वच्छता दर्शवते. पांढरी चादरीमूळे खोली अगदी स्वच्छ दिसते. आणि कस्टमर लगेच ती रुम बुकिंग करतो.
विशेष कारण
1990च्या दशकापूर्वी हॉटेलमध्ये रंगीबेरंगी चादरी वापरली जात होती. त्याची निगा राखणे देखील सोपे होते कारण त्यावरील डाग लपवता येत होते. त्यानंतर, वेस्टिनच्या हॉटेल डिझाइनर्सनी एक संशोधन केले ज्यामध्ये अतिथीसाठी लक्झरी बेड असणे म्हणजे काय असे म्हटले होते. ज्यानंतर पांढर्या बेडशीटचा ट्रेंड सुरू झाला.