या दहा कलाकारांनी केले आहे हॉलीवूडमध्ये काम, नंबर 9 च्या अभिनेत्याने केले आहे पाकिस्तानी चित्रपटात काम..

मराठी चित्रपटात काम केल्यानंतर अनेक अभिनेत्यांना हिंदी चित्रपटात काम करण्याची ओढ असते. त्याचप्रमाणे हिंदी चित्रपटात काम केल्यानंतर अनेक अभिनेत्यांना आपण हॉलीवूड मध्ये काम करावे असेही वाटते. अनेक हॉलीवुडचे कलाकार देखील बॉलिवूडमध्ये नशीब अजमावत असतात. काही अभिनेत्यांनी बॉलिवूडमध्ये काम देखील केली आहे. यात लगान आणि इतर चित्रपटांचा समावेश आहे. आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये कोणत्या बॉलिवूड कलाकारांनी हॉलिवूडमध्ये काम केले याबाबत माहिती देणार आहोत..
१. इरफान खान: इरफान खान अतिशय ताकदीचा अभिनेता होता. काही दिवसांपूर्वी त्याचे निधन झाले आहे. इरफान खान याने हिंदी चित्रपटात आपला ठसा उमटवला होता. त्याप्रमाणे त्याने हॉलिवूडमध्ये देखील काम केले होते. त्याने न्यूयार्क आय लव यु, द वॉरियर, जुरासिक वर्ल्ड या चित्रपटात काम केले होते.
४. अमिताभ बच्चन: बॉलिवूडमध्ये अमिताभ यांना महानायक असे संबोधले जाते. हिंदी चित्रपटात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण भूमिका केल्या असून त्यांचे अनेक चित्रपट तुफान हिट झालेले आहेत. त्यांनी हॉलीवूडमध्ये देखील नशीब आजमावले होते. त्यांनी द ग्रेट गोरसबी या चित्रपटात काम केले होते. 2013 मध्ये हा चित्रपट आला होता.
५. अमरीश पुरी: अमरिश पुरी यांनी आपल्या अदाकारीने बॉलिवूडमध्ये चांगले यश मिळाले होते. खलनायका सोबतच त्यांनी चरित्र भूमिका मोठ्या खुबीने साकारलेल्या होत्या. अमरीश यांच्या अभिनयाचा जलवा हॉलीवुडपर्यंत पोहोचला होता. अमरिश पुरी यांनी इंडियना, जोन्स अंड टेंपल ऑफ ड्रग या चित्रपटात काम केले होते.
६. रणदीप हुडा: रणदीप हुडा याने बॉलीवूड मध्ये काही चित्रपटात काम केले आहे. मात्र, त्याला फारसे यश मिळाले नाही. त्याने हॉलीवूड चित्रपटात देखील काम केले आहे. एक्स ट्रॅक्शन या चित्रपटात त्याने भूमिका बजावली होती. हा चित्रपटही जेमतेम चालला होता.
७. फ्रिदा पिंटो: फ्रिदा पिंटो हिने बॉलिवूडमधील काही चित्रपटात काम केले आहे. मात्र, असे असले तरी तिला हॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट मिळाले होते. यात तिने यू विल मिट लॉट स्ट्रेंजर, प्राईस ऑफ प्लॅनेट यासह अनेक चित्रपटात काम केले आहे.
८. ओम पुरी: ओम पुरी यांनी देखील अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले आहे. ओम पुरी यांनी अनेक हॉलीवूड चित्रपटात काम केले आहे. त्यांनी माय सन द फिनी टिक, सिटी ऑफ जोय, ईस्ट इज ईस्ट, घोस्ट ओर डार्कनेस या चित्रपटात काम केलं होते.
९. नसरुद्दीन शहा: नसरुद्दीन शहा यांनी आजवर अनेक हिंदी चित्रपटात काम केले असून त्यांनी बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी हॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे. लीज ऑफ एक्स्ट्रा जेंटलमॅन या चित्रपटात त्यांनी काम केले आहे. तसेच त्यांनी पाकिस्तानी जिंदा भाग या चित्रपटात देखील काम केले आहे. या चित्रपटामुळे त्यांच्यावर टीका झाली होती.
१०. दीपिका पादुकोण: दीपिका पदुकोन हिने शाहरुख खान सोबत ओम शांती ओम या चित्रपटातून पदार्पण केले. बॉलिवूडमध्ये तिने अनेक हिंदी चित्रपट दिले आहेत. हॉलीवूडमध्ये देखील तिने काही चित्रपटात काम केले आहे. एक्स एक्स एक्स रिटर्न ऑफ जेंडर या चित्रपटात तिने काम केले आहे. हा चित्रपट चालला होता.