‘या’ 5 सुपरस्टार्सनी केले आहे अतिशय कमी वयात लग्न !

बॉलिवूड मध्ये बरेचजण अजूनही असे आहेत ज्यांचे लग्न झालेले नाही. उदा.सलमान खान, रेखा आणि तबु यांच्यासारखे खूप आहेत. बॉलिवूडमध्ये बरेचजण अगोदर यशस्वी होतात आणि त्यानंतर मग लग्न करतात. कारण काहींचा असा समज आहे की, आपल्या यशात संसाराचा अडथळा येऊ नये, म्हणून यशस्वी झाल्यानंतरच लग्न करावे.
मात्र बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांनी अतियश कमी वयात लग्न केलं आणि तरीही ते यशाच्या सर्वोच्च शिखरावर आहेत. जाणून घेऊया असा पाच कळकरांबद्दल.
त्यावेळी शाहरुख फक्त २५ वर्षाचा होता. शाहरुखचाही त्यावेळी संघर्षाचा काळ होता, मात्र या आपल्या स्ट्रगलिंगच्या काळातही शाहरुखने आपल्या प्रेमाला मागे सोडले नाही आणि आज तो पत्नी गौरी सोबत एक चांगले वैवाहिक आयुष्य जगत आहे.
आमिर खान
आज बॉलिवूडमध्ये आमिर खानची मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख आहे. आमिरचे लग्न १९८६ मध्ये रिना दत्तासोबत झाले होते. तेव्हा आमिर फक्त २१ वर्षाचाच होता. अर्थात त्याचा त्यावेळी करिअरसाठी संघर्ष सुरु होता. काही काळ एकत्र राहिल्यानंतर मात्र दोेघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आमिर खान ने किरण राव हिच्याशी लग्न केले. पत्नी किरणसोबत आमिर खान खूप सुखी आयुष्य जगत आहे.
गोविंदा
बॉलिवूडचा कॉमेडी किंग आणि डान्सिंग सुपरस्टार गोविंदाने जेव्हा १९८७ मध्ये सुनीता सोबत लग्न केले तेव्हा तो फक्त २१ वर्षाचाच होता. त्याने आपल्या करिअर यशस्वी होण्याअगोदरच लग्न केले होते. लग्नानंतर गोविंदाने खूप मेहनत करुन शिखर गाठले. लग्नाच्या बऱ्याच वर्षानंतर गोविंदा आणि सुनिता आजही एकमेकांसोबत सुखी आयुष्य जगत आहेत.
सैफ अली खान
पतौडीचा नवाब अर्थात सैफ अली खानने जेव्हा अमृता सिंगसोबत लग्न केले तेव्हा तो फक्त २२ वर्षाचा होता. आणि त्यावेळी अमृता त्याच्यापेक्षा ८ वर्षांनी मोठी होती. त्यामुळे या लग्नाच्या खूपच चर्चाही रंगल्या होत्या. मात्र काही वर्षानंतर या दोघांचा घटस्फोट झाला.
सैफ अली खानपासून अमृताला सारा अली खान आणि इब्राहिम अली खान हे दोन मुले आहेत. त्यापैकी सारा अली खानने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आहे. तर दुसरीकडे मुलगा इब्राहिम सुद्धा बॉलिवूडमध्ये पर्दापण करण्यासाठी सज्ज आहे.
ऋतिक रोशन
अभिनेता संजय खान यांची मुलगी सुजैन खानसोबत जेव्हा ऋतिक रोशनने लग्न केले तेव्हा तो फक्त २६ वर्षाचा होता. विशेष म्हणजे लग्नाच्या वेळी ऋतिकचे करिअरमध्ये खूपच संघर्ष सुरु होते. दोघेही आपल्या संसारात रमले होते, मात्र काही कारणास्तव दोघांचा घटस्फोट झाला.