‘या’ अभिनेत्रीची आई करायची घरकाम, आज ‘ही’ अभिनेत्री आहे करोडोची मालकीण

‘या’ अभिनेत्रीची आई करायची घरकाम, आज ‘ही’ अभिनेत्री आहे करोडोची मालकीण

आयुष्यामध्ये यश मिळवायचे झाले तर कष्ट केल्याशिवाय पर्याय नसतो. जो व्यक्ती आयुष्यात कष्ट करतो, तो कालांतराने मोठा होतोच. आजवरचा हा अलिखित नियम आहे. मात्र, काही लोकांना जन्मजातच खूप संपत्ती मिळालेली असते. यातील काही लोक हे संपत्ती टिकवून ठेवतात.

तर काही लोक संपत्ती उडवून टाकतात, अशी उदाहरणं आपण बरेचशे पाहिली असतील.बॉलीवूडमध्ये देखील अशी अनेक उदाहरणे आहेत की, ज्यांनी अतिशय गरिबीतून आपले करिअर सुरू केले आहे. यामध्ये शाहरूख खान याचे उदाहरण आपल्याला देता येईल. शाहरुख खान यांच्याकडे काहीही संपत्ती नव्हती.

त्यानंतर त्याने मागे वळून कधीच पाहिले नाही. आज तो कोट्यावधी रुपयाचा मालक आहे. आज आपल्या एका महिला कॉमेडियन बाबत माहिती देणार आहोत. तिने आपल्या आयुष्याबद्दल काही खाजगी गोष्टी सांगितलेल्या आहेत.

या अभिनेत्रीचे नाव भारती सिंह असे आहे. भारती सिंह हिने तिच्या आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल केले आहे. अनेक खस्ता खाऊन तिने तिचे करियर केले आहे. भारती सिंह हिने नुकतीच एक मुलाखत देऊन आपल्या खासगी आयुष्याबद्दल माहिती शेअर केली आहे. भारती दोन वर्षांची असताना तिच्या वडिलांचे आघाताने निधन झाले.

भारतीला दोन बहिण भाऊ होते. त्यामुळे कुटुंबाचा खर्च चालवणे खूप अवघड होऊन बसले होते. त्यामुळे भारतीवर देखील काम करण्याची जबाबदारी पडली.भारती सिंहची आई कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी लोकांच्या घरचे घर काम करत होत्या. तसेच त्या लोकांच्या घरी जाऊन स्वयंपाक बनवत.

काही वेळेस भारती देखील आईसोबत जायच्या. एक वेळेस भारती एका घरी गेल्या त्यावेळेस ते घर खूप मोठे होते. त्यावेळी भारती यांच्या मनात असा विचार आला की, असे आपले घर कधी होईल. तिने सांगितले की, आयुष्यात कष्ट केले की त्याचे चीज हे होतेच. एक वेळेस कॉलेजमध्ये असताना मी मैत्रिणीसोबत दंगामस्ती करत होते. त्यावेळेस तेथून दिग्दर्शक सुदेश लहरी यांनी मला पाहिले होते.

त्यानंतर त्यांनी माझ्या शिक्षकांना जाऊन सांगितले की, या मुलीला मला माझ्या शो घ्यायच आहे. मात्र, त्यानंतर मी असे काम करण्यास नकार दिला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी मला सांगितले की, तुझ्या शाळेची फी देखील माफ होईल आणि शाळेचे नाव होईल. तसेच तुला काही पैसा देखील हातात मिळेल.

त्यांनी सांगितलेला विचार मला पटला आणि मी कॉमेडी ड्रामामध्ये काम करण्यास होकार दिला. त्यानंतर माझे आयुष्यच बदलून गेले. आज माझ्याकडे सर्व काही आहे. घर गाडी बंगला सर्वकाही आहे. त्यामुळे आयुष्यात आपण प्रामाणिकपणे कष्ट केले, तर त्याचे चीज हे नक्कीच होते, असेही तिने या वेळी बोलताना सांगितले.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.