रणबीरचे आलियासोबत सुरु आहे प्रेमप्रकरण..तरीसुद्धा, ‘या’ अभिनेत्रीला करायचे आहे रणबीरसोबत लग्न…

बॉलीवूडमध्ये कपडे बदलल्यासारखे अभिनेता व अभिनेत्री आपले पार्टनर बदलत असतात. गेल्या अनेक वर्षापासून हा ट्रेंड बॉलिवूडमध्ये पाहायला मिळतो. अभिनेता रणबीर कपूर याचे देखील असेच आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितलं की, आपण वयाच्या सोळाव्या वर्षी आपली वर्जिनिटी गमावली होती.
रणबीर कपूर यांचे वडील म्हणजे ऋषी कपूर यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. या निधनामुळे रणबीर कपूरला चांगलाच धक्का बसला आहे. रणबीर कपूर याने सावरिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट बऱ्यापैकी चालला होता. या चित्रपटातील रणबीर कपूर यांचा टॉवेल डान्स चांगलच चालला होता.
या दोघांचे प्रेमप्रकरण देखील चर्चेत आले होते. कॅटरिना अनेकदा त्याच्या घरी जायची. मात्र, नीतू सिंग यांना कॅटरिना पसंत नसल्याचे सांगण्यात येत होते. रणबीर आणि कॅटरिना यांचे काही अर्धनग्न फोटो देखील प्रदर्शित झाले होते. त्यानंतर त्यांच्या प्रेमप्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर दोघांचे प्रेम प्रकरण संपुष्टात आले. कॅटरिना हिच्या जीवनात मात्र कुणीही आले नाही.
त्यानंतर मात्र रणबीरच्या जीवनात आलीया भट आली. सध्या दोघेही लॉकडाऊनमुळे एकत्र राहात असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसापूर्वी आलिया भट रणबीरच्या घरून आपले वडील महेश भट यांच्या घरी रात्रीच्या सुमारास गेल्याचे पाहायला मिळाले होते. असे असले तरी रणबीर याच्यासोबत लग्न करण्यास अनेक तरुणी उत्सुक असतात. यात अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. मात्र, आम्ही आपल्याला एका वेगळ्याच अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे ती..
ही आहे ती अभिनेत्री
या अभिनेत्रीचे नाव आहे, सारा अली खान होय. सैफ अली खानची मुलगी म्हणजे सारा.. काही वर्षांपूर्वी आलेल्या कॉफी विथ करण या शोमध्ये सारा अली खान हिने वडील सैफ अली खान यांच्यासोबत हजेरी लावली होती. या वेळी करण जोहरने रॅपिड फायर प्रश्नअंतर्गत तिला अनेक प्रश्न विचारले होते.
त्यावेळी त्याने साराला प्रश्न विचारला होता की, तू डेट कोणासोबत करशील त्यावर साराने सांगितले होते की, मी कार्तिक आर्यनसोबत डेट करेल. तर लग्न करायचा विषय आला तर मी रणबीर कपूर याच्यासोबत लग्न करेल. त्यावेळी या वाक्यावर चांगली चर्चा झाली होती.
त्यानंतर आरजे मलिष्का हिनेदेखील यावरून साराला प्रश्न विचारून भंडावून सोडले होते. तसेच आलिया भटवरून तिला खूप चिडवले देखील होते. मात्र, त्यानंतर सारा अली खान हिने आपण आता रणबीर कपूर सोबत लग्न करण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले होते.