ही अभिनेत्री घेते एका चित्रपटासाठी एवढे कोटी रुपये, तर हिला मिळतात सर्वात कमी पैसे

ही अभिनेत्री घेते एका चित्रपटासाठी एवढे कोटी रुपये, तर हिला मिळतात सर्वात कमी पैसे

सर्वसामान्य नागरिकांना बॉलिवूड कलाकारांचे मोठे आकर्षण असते. बॉलीवूड कलाकार काय खातात, काय पितात, कसे राहतात, किंवा दिवसभर ते काय काम करतात. त्यांच्या घरात कोण काय काम करते, याबद्दल सर्वसामान्यांना कायम माहिती पाहिजे असते.

तसेच कलाकारांना चित्रपटात काम करून किती पैसे मिळतात. याबद्दल देखील त्यांच्या चाहत्यांना माहिती हवी असते. तर आम्ही आपल्याला या लेखात बॉलीवूडच्या अभिनेत्री किती मानधन घेतात, याबद्दल माहिती सांगणार आहोत.

8. दिशा पाटणी : टायगर श्रॉफ सोबत हिने चित्रपट केला आहे. सध्या बॉलिवुडमध्ये ही देखील नवीन असली तरी सध्या ती एका चित्रपटासाठी सात कोटी रुपये आकारत असल्याचे जाणकारांनी सांगितले. काही दिवसात तिच्याकडे आणखी काही चित्रपट येण्याची शक्यता आहे. त्यानंतर तिच्या मानधनात वाढ होण्याची शक्यता अधिक आहे.

7. सोनाक्षी सिन्हा : सलमान खान याच्यासोबत दबंग या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी ही अभिनेत्री सर्वांची लाडकी बनली होती. मात्र, आता तिच्याकडे काही मोजके चित्रपट आहेत. एका चित्रपटासाठी १० कोटी रुपये आकारात असल्याचे सांगण्यात आले. वडील शत्रुघन सिन्हा यांच्या प्रमाणेच एकदम बिनधास्त वावरणारी आहे.

6. ऐश्वर्या राय बच्चन: ऐश्वर्या राय बच्चन हिने बॉबी देओल यांच्या सोबत पहिला चित्रपट केला. त्यानंतर तिने अनेक हिट चित्रपट दिले होते. त्यानंतर काही वर्षांपूर्वी तिने अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चनने सोबत लग्न केले. त्यानंतर आता ती बॉलिवूडमध्ये कमीच वावरताना दिसते. ऐश्वर्या राय एका चित्रपटासाठी ९ कोटी रुपये आकारते.

5. परिणीती चोप्रा: अल्पावधीतच आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी ही अभिनेत्री बॉलीवूडमध्ये सध्या सेट झाली आहे. गोलमाल या चित्रपटात तिने अजय देवगन यांच्यासोबत काम केले आहे. सध्या तिच्या हातावर काही चांगली चित्रपट असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच ती एका चित्रपटासाठी 12 कोटी रुपये मानधन घेते, असे सांगण्यात आले आहे.

4. आलिया भट: दिग्दर्शक निर्माते महेश भट आणि सोने रजदान यांची मुलगी असलेली आलिया सध्या सर्वांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. सध्या रणबीर कपूरसोबत तिचे प्रेम प्रकरण सुरू आहे आणि ती एका चित्रपटासाठी तब्बल 22 कोटी रुपये मानधन घेत असल्याचे सांगण्यात आले आहे.

3. श्रद्धा कपूर : बॉलिवूडच खलनायक अर्थात शक्ती कपूर यांची मुलगी असलेली श्रद्धा कपूर बॉलिवूडमधील सर्वाधिक मागणी असलेली अभिनेत्री आहे. श्रद्धाकडे सध्या अनेक चित्रपटांच्या ऑफर असल्याचे सांगण्यात येते. एका चित्रपटासाठी श्रद्धा तब्बल 23 कोटी रुपये आकारते.

2. दीपिका पादुकोण: अभिनेता रणवीर सिंग याच्यासोबत लग्न करून सुखी संसार करत असलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण काही मोजकेच पण चांगले चित्रपट करते. लॉक डाउनमुळे सध्या ती घरीच आहे. मात्र, त्यानंतर कामाला सुरुवात करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एका चित्रपटासाठी ती 25 कोटी रुपये आकारते.

1. कंगना राणावत: ही आहे सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री,.काही वर्षांपूर्वी अभिनेता ऋतिक रोशन याच्यासोबत वाद घालून चर्चेत आलेली अभिनेत्री अर्थातच कंगना राणावत. ही बॉलीवूडमध्ये सध्या सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून गणल्या जाते. एका चित्रपटासाठी कंगना 27 कोटी रुपये घेत असल्याचे सांगण्यात आले आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *