धक्कादायक! अभिनेत्यासह संपूर्ण कुटुंब करोना पॉझिटिव्ह ! इन्स्टाग्रामवरून दिली माहिती….

सध्या संपूर्ण जगभरामध्ये कोरोनाचे थैमान चालू आहे कोरोनामुळे सर्वसामान्य माणूसच नव्हे तर संपूर्ण विश्वातील सेलिब्रिटी राजकारणीसुद्धा कोरोनाच्या विषाणूला बळी पडल्याची उदाहरणे आहेत. यामुळे कोरोना पासून बचाव करण्यासाठी ज्या सेलिब्रिटींना या आजाराची लागण झाली होती व ते आता पूर्णपणे बरे होऊन सेल्फ आयसोलेशन मध्ये आहेत.
अशा सेलिब्रिटींनी सर्वसामान्य माणसाला या आजारापासून बचाव करण्यासाठी आपल्या घरी सुरक्षित राहण्याचा सल्ला स्वानुभवावरून दिला आहे .कोरोना विषाणूची लागण जर घरातील सर्वच सदस्य अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांना झाली असेल तर त्या कुटुंबाची अवस्था किती हृदयद्रावक अशी झाली असेल याचा अंदाज करणेही कठीण आहे.
त्याने सोशल मीडिया वरील आपल्या अकाऊंट द्वारे तो स्वतः आणि त्याचे कुटुंबीय यांनासुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे आपल्या चाहत्यांना सांगितले आहे.या संदेशामध्ये त्याने कोरोनाची लागण झाल्यानंतर आपण कोणकोणत्या अनुभवांमधून पुढे गेलो याचे वर्णन केले आहे.
पुरबने या संदेशामध्ये असे सांगितले आहे की तो आणि त्याचे मुलगी व पत्नीला ही कोरोनाची लागण झाली होती. सर्वात प्रथम त्याची मुलगी इनाया हिला सातत्याने चार दिवस एकशे चार इतका ताप होता व सर्दी आणि खोकल्याचा त्रास सुद्धख जाणवत होता. त्यानंतर त्याच्या पत्नीच्या छातीमध्ये त्रास जाणवू लागला व त्याला स्वतःला प्रचंड प्रमाणामध्ये सर्दीचा त्रास होऊ लागला.
यानंतर पुरब आणि त्याची पत्नी या दोघांनाही सर्दी ताप व खोकल्याचा आणि श्वसनाचा त्रास होऊ लागला या. तिघांचेही कोरोनाची चाचणी रुग्णालयांमध्ये केली.गेली व या तिघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. पाचव्या दिवशी पुरबच्या मुलीचा ताप उतरण्यास सुरुवात झाली व त्यानंतर उपचारांनंतर त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयांमधून डिस्चार्ज मिळाला आहे.
आता हे तिघे सुद्धा लंडनमध्येच सेल्फ आयसोलेशनमध्ये आपली काळजी घेत आहेत.आपण हा संदेश जे कोणी या परिस्थितीमधून जात आहेत त्यांना आधार वाटावा म्हणून शेअर करत आहोत असे पूरबने या पोस्टमध्ये नमूद केले आहे. घरीसुद्धा सेल्फ आयसोलेशनमध्ये पूरब आणि त्याचे कुटुंबीय विशेष काळजी घेत आहेत जेणेकरून पुन्हा कोरोनाची लागण होण्याचा धोका उद्भवू नये.
क्वारंटाईन मध्ये सुद्धा पुरब आणि त्याचे कुटुंबीय गरम पाण्याने गुळण्या करत आहेत त्यामुळे घशालाआराम मिळतो. आले,मध आणि हळद यांचे मिश्रण सुद्धा ते खात आहेत. गरम पाण्याने अंघोळ करणे सुद्धा खूप आराम देणारे ठरते असे पूरबने सांगितले आहे.