‘या’ अभिनेत्यामुळे ऐश्वर्या पहिल्यांदा रागवली सासरे अमिताभ बच्चन यांच्यावर.. ऐश्वर्याला म्हणाला होता लिपिस्टिक.. जाणून घ्या कोण आहे तो

ऐश्वर्या रॉय बॉलिवूडला पडलेले एक मधुर स्वप्न असेच म्हणावे लागेल. ऐश्वर्या रॉय ही माजी मिस वर्ल्ड आहे. आजवर तिला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. तसेच आजवर तिने अनेक अभिनेत्यांसोबत काम केले आहे. बॉलीवूडला तिच्या रुपाने एक मौल्यवान अभिनेत्री भेटली आहे.
ऐश्वर्या रॉय हिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. त्यानंतर ती मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती. 1994 मध्ये तिला मिस वर्ल्ड पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. सहाजिकच मिस वर्ल्ड झाल्यानंतर तिने बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्याचे ठरवले.
मात्र, हम दिल दे चुके सनम या चित्रपटानंतर ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते की याचे भान दोघांनाही राहत नव्हते. सलमान खान रात्री-बेरात्री ऐश्वर्याच्या घरी जात होता. सलमान खान याला मद्यपानाची सवय असल्यामुळे अनेकदा त्यांचा वाद देखील झाला.
ऐश्वर्याला सलमान याने मारहाण देखील केल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर एक दिवस रात्री सलमान खान ऐश्वर्याच्या घरी जाऊन वाद करू लागला. त्यावेळी तिने पोलिसात तक्रार केली. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले होते. या प्रकरणानंतर दोघातील संबंध संपुष्टात आले होते. त्यानंतर ऐश्वर्याचे विवेक ओबेरायसोबत सुत जुळले.
मात्र ही गोष्ट सलमान खानला अजिबात आवडली नाही. त्यामुळे सलमानने त्याला फोन करून झाप झापले होते. या प्रकरणात विवेक ओबेराय याने पत्रकार परिषद घेऊन सलमान खानला उत्तर दिले होते. त्यांनंतर सलमान आणि विवेक ओबेराय यांच्यात देखील जमत नव्हते.
कालांतराने ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले आणि सुखी संसार करू लागली. काही वर्षापूर्वी एका कार्यक्रमामध्ये विवेक ओबेराय याने जाहीरपणे सलमान खानची माफी देखील मागितली होती. मात्र, सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. आता ऐश्वर्या राय बच्चन घराण्याची सून झाली आहे. मात्र, असे असूनही अमिताभ आणि ऐश्वर्या यांचे नाते अतिशय चांगले आहे.
हा आहे तो अभिनेता
अमिताभ ऐश्वर्याला आपल्या मुलीसारखे वागवतात. मात्र, अमिताभ सध्या काही चित्रपटांतून काम करत असतात. अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वीच इमरान हाशमी यांच्यासोबत चेहरे नावाचा चित्रपट स्वीकारला आहे. हीच बाब ऐश्वर्या हिला अजिबात आवडली नाही. ऐश्वर्याची इच्छा अशी आहे की, अमिताभ यांनी इमरान हाशमी याच्यासोबत काम करू नये.
त्यामागील कारणही तसेच आहे. काही वर्षांपूर्वी इम्रान हाश्मी हा करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी इम्रान हाश्मीने ऐश्वर्या राय हिला लिपिस्टिक असे संबोधले होते. त्यामुळे ऐश्वर्या जाम खवळली होती.
तेव्हापासूनच ऐश्वर्याचा इम्रान हाश्मीवर प्रचंड राग आहे. ऐश्वर्या हिने ही बाब एका मुलाखतीत देखील सांगितली होती. आता सुनबाई रागावल्याने अमिताभ बच्चन इम्रान हाश्मीसोबत चित्रपट करतात की नाही हे येणारा काळच ठरवेल.